नाशिक : जात पडताळणीसाठी लाच घेणारा खासगी दलाल एसीबीच्या जाळ्यात | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

private broker caught by NCB  while accepting rs 70000 bribe for caste verification

नाशिक : जात पडताळणीसाठी लाच घेणारा खासगी दलाल एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दुकान थाटलेल्या दलालाचा लाच लुचपत प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे, जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लाच घेताना सापळा लावून एका खासगी दलालाला अटक करण्यात आली.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षणकडे राज्यातील अनेक समित्यांचा कार्यभार असल्याने कार्यालयात काही लिपिकांनी दुकानदारी सुरू केली होती सकाळने नागरिकांच्या तक्रारीची डिसेंबर महिन्यात बातमी प्रसिध्द केली होती तिची दखल घेत सामाजिक न्याय मंत्र्यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांसाठी समिती अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नमले होते. आजच्या सापळा कारवाईने सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले अशी त्रस्त विद्यार्थी आणि पालकांची चर्चा होती.

हेही वाचा: नाशिक : नववर्षात ७७ टक्‍के बाधित शहरातील; आठ दिवसांत दोन हजार ८९७ बाधित

दरम्यान निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र देण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांनी दलाल गणेश बाबुराव घुगे (वय २७), व्यवसाय- खाजगी कंत्राटी वाहन चालक रा. नाशिक याला सापळा लावून अटक केली

कार्यालयात शनिवारी (ता ८) तक्रारदाराने निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण मंजूर करून देण्यासाठी मागणी केली असता त्याला ७० हजार रुपये मागितले होते खाजगी दलाला विरोधात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती पोलीस निरीक्षक, मीरा आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक प्रवीण महाजन ,नितीन कराड, प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे ,अमोल मानकर संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने कारवाई केली.दरम्यान हा दलाल कुणासाठी पैसे गोळा करायचा हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला सूत्रधार शोधण्यास अद्याप यश आलेले नाही

हेही वाचा: नाशिक : चोरट्यांकडून हस्तगत माल मूळ मालकांना केला परत

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. - सुनील कडासने (पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top