शाबासकी नाही, पण शासकीय अनास्‍थेचे दर्शन!

covid hospital
covid hospitalesakal

नाशिक : ‘गरज सरो, वैद्य मरो’ ही म्‍हण जुन्‍याजाणत्‍यांची अशीच बनविली नसावी, याची प्रचीती खासगी वैद्यकीय व्‍यावसायिकांना सध्या येतेय. कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत सार्वजनिक आरोग्‍य व्‍यवस्‍थेवरील ताण हलका करणाऱ्या या खासगी डॉक्‍टरांना आता विविध माध्यमातून नोटिसा बजावण्याचे सत्र सुरू झाले आहे. केलेल्‍या कामाची शाबासकी तर नाही, पण शासकीय अनास्‍थेचेच दर्शन सध्या डॉक्‍टरांना घडत आहे. (private-hospital-situation-after-corona-second-wave-nashik-marathi-news)

शाबासकी नाही, पण शासकीय अनास्‍थेचे दर्शन

कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत रुग्‍णालयात खाटा मिळणे कठीण झाले होते. अशा भयावह परिस्‍थितीत खासगी रुग्‍णालयांनी यंत्रणेवरील ताण हलका करताना मोठ्या रुग्‍णसंख्येवर उपचार केले. या कालावधीत राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांचा खाटा उपलब्‍धतेसाठी दबाव होता तो वेगळाच. पण अशा कठीण काळात दिलेल्‍या सेवेचे अप्रूप तर नाही, पण सध्या डॉक्‍टरांकडे आरोपीच्‍या नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वीच खासगी रुग्‍णालयांना मृत्युदरासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती. या घटनांमुळे गंभीर स्‍वरूपाच्‍या रुग्‍णांवर उपचार करावे की नाही, अशी मनःस्‍थिती निर्माण होत असल्‍याचे डॉक्‍टरांकडून खासगीत सांगण्यात येत आहे.

कायद्याचा धाक दाखवत माहितीची मागणी

प्रशासकीय यंत्रणेकडून कायद्याचा धाक दाखवत विविध स्‍वरूपाची माहिती रुग्‍णालयांकडून मागविण्यास सुरवात झाली आहे. गेल्‍या आठवड्यात महापालिकेच्‍या मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडून ५१ रुग्‍णालयांना नोटिसा बजावल्‍या. १ मार्च ते ३१ मे या कालावधीत दाखल रुग्ण व सोडलेल्‍या रुग्‍णांची यादी, रुग्‍णांची देयके व अन्‍य तपशील तीन दिवसांत सादर करण्यास सांगितले होते. अशा स्‍वरूपात दबावतंत्र निर्माण करण्यापेक्षा सरकारी, महापालिका रुग्‍णालयांत प्रतिरुग्‍णामागे किती खर्च झाला याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला आरसा दाखविणारी ठरेल, असे खासगी वैद्यकीय क्षेत्रात बोलले जात आहे. एकंदरीत या घटनांचा वीट आल्‍यानेच कोविड रुग्‍णालये बंद करण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याची वेळ ओढावल्याचे बोलले जात आहे.

covid hospital
वऱ्हाडी मंडळींना लग्न पडले महागात! 5 हजारांचा बसला फटका

डॉक्‍टरांना पाळावा लागतोय निषेध दिन

गेल्‍या दहा वर्षांत झाले नाहीत, इतके हल्‍ले डॉक्‍टरांवर गेल्‍या दीड वर्षात झाले आहेत. राज्‍यात अशा १५ घटनांच्‍या कायदेशीर नोंदी आहेत. वास्‍तविकरीत्‍या डॉक्‍टर कोरोनायोद्धा म्‍हणून सन्‍मानपात्र आहेत. परंतु अशा घटनांमुळे याच डॉक्‍टरांना निषेध दिन पाळावा लागतोय. शुक्रवारी (ता. १८) देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे.

हेही विसरायला नको

*कोरोना काळात रुग्‍णाचे नातेवाईक-डॉक्‍टरांतील संघर्ष वाढला

*तीन रुग्‍णालयांवर हल्ल्‍याच्‍या तक्रारी दाखल.

*डॉक्‍टर, परिचारिकांसोबत गैरवर्तवणुकीच्या अनेक तक्रारी कागदावर नाहीच.

*अनेक डॉक्‍टरांवर वाढला मानसिक तणाव.

covid hospital
बलात्काराच्या गुन्‍ह्यातील निलंबित पोलिस निरीक्षक गजाआड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com