Nashik News : आयातशुल्कप्रश्‍नी केंद्र कधी जागे होणार? बांग्लादेशने केलेल्या वाढीचा द्राक्षपंढरीला फटका

नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांचा प्रश्‍न
Grapes Crop
Grapes Cropesqakal

वडनेर भैरव (जि. नाशिक) : द्राक्षपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक यंदा अस्मानी सुलतानी संकटातून जात असून आधीच यंदा पावसामुळे द्राक्षांचे उत्पादन घटले आहे.

बागेसाठी केलेला खर्चही निघणार की नाही अशी स्थिती असताना आता सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बांगलादेशाने द्राक्षाच्या आयात शुल्कात केलेल्या वाढीने द्राक्ष उत्पादकांच्या संकटात मोठीच भर पडली आहे.

सध्या द्राक्षहंगाम तेजीत आलेला असताना बांगलादेशाच्या या निर्णयाने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याप्रश्‍नी केंद्र सरकारला वांरवार विनंती करण्यात येत असून सरकार केवळ पत्रव्यवहार केल्याचे सांगत आहे.

याप्रश्‍नी थेट संवाद साधत हा प्रश्‍न वेळीच निकाली काढण्याची गरज आहे. द्राक्षहंगाम संपल्यानंतर वरातीमागून घोड्याचा प्रकार होऊ नये अशी विनंती द्राक्षउत्पादक केंद्र सरकारकडे करीत आहेत. (problem of grape growers in Nashik increase in Bangladesh hit grape harvest Minister Dr bharati Pawar should pay attention to central government nashik news)

Grapes Crop
Nashik News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थांनी सुरु असलेले काम पाडले बंद

यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या प्रारंभीच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादकांना वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याच्या आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासनही मात्र हवेतच विरल्याचे दिसत असून द्राक्षउत्पादक निराश झाले आहेत.

भारतातून द्राक्ष घेण्यासाठी बांगलादेशाने आयातशुल्क मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. त्याचा भार व्यापारी आपल्यावर‌ न‌ घेता शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे. त्यामुळे दरवर्षी 60 ते 65 रुपये किलोने बांगलादेशला पाठविण्यात येणारे अनुष्का, आरके, एसएसएन, सोनाका या व्हरायटीची द्राक्ष 40 ते 50 रुपयाने पाठवावी लागत आहेत.

या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून नंतर हाच माल चढ्या दराने आखाती देशांना बांगलादेशचे व्यापारी पाठवतात.

स्थानिक थॉमसनला फटका

निघणारा माल जास्त साठवू शकत नसल्याने शेतकरी नाइलाजाने भारतातच 30 ते 35 रुपये दराने व्यापाऱ्यांना द्राक्ष देण्यास पसंती देत आहेत. दुप्पट एक्सपोर्ट ड्यूटी भरण्यापेक्षा देशांतर्गत द्राक्ष देण्यात वावगे काय, अशी भूमिका शेतकरी मांडत असले तरी याचा फटका देशांतर्गत दरवर्षी विकल्या जाणाऱ्या थॉमसनसारख्या छोट्या आकाराच्या द्राक्षांना बसत आहे.

अनुष्का, आरके, एसएसएन, सोनाका ही लांब आकाराची द्राक्ष भारतात ३५ ते‌ ४० रुपये किलो दरात मिळत असल्याने थॉमसन जातीच्या द्राक्षाकडे स्थानिक ग्राहक पाठ फिरवत असल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी, सर्वच द्राक्ष उत्पादकांना मोठा फटाका सहन करावा लागत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

युरोपच्या निर्यातीवर परिणाम

बांगलादेशच्या दराचा फटका युरोपच्या द्राक्षालाही बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशने वाढवलेल्या द्राक्षावरील आयात शुल्कामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या द्राक्षाचे दरावर परिणाम झाला आहे.

याचा आणि युरोप देशांमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या दराचा संबंध नसतानाही निर्यातदार स्वतःचा फायदा करत दर कमी करत आहेत. निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन करूनही उत्पादकांना दर कमी मिळत असून आर्थिक नुकसान होत आहे.

डॉ. पवारांच्या आश्वासनाच काय?

डॉ. पवार मंत्री होण्यापूर्वी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करताना आक्रमक राहत होत्या. यंदाचा हंगाम सुरू होताना वडनेरभैरव येथे कार्यक्रमात द्राक्ष उत्पादकांना बांगलादेशच्या द्राक्षाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, मात्र आजपर्यंत जवळपास निम्मा हंगाम संपत आला असूनही कुठल्याही तोडगा निघाला नसल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उत्पादकांना दिलेल्या आश्वासनाचे नेमकं काय झाले असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मंत्री डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन लवकरच तोडगा निघेल असा प्रतिसाद मिळाल्याचे केंद्रीय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Grapes Crop
Immunity Booster Fruits : वाढत्या उन्हामुळे फळे खरेदीकडे कल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com