Traffic Problem : व्यापारी संकुलांसमोरच पार्किंग; पे-पार्किंग असताना वाहने रस्त्यावरच...

Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik news
Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik newsesakal

Traffic Problem : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम असतानाच, त्यात व्यापारी संकुलांसमोरील अनधिकृत पार्किंगच्या समस्येची भर पडली आहे. शहरातील बहुतांशी व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. काही संकुलामध्ये पार्किंग आहे, परंतु त्याठिकाणी पार्किंगसाठी पैसे आकारले जातात.

परिणामी, वाहने रस्त्यालगतच पार्क केली जात असल्याने त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे. याबाबत ना महापालिकेकडून कारवाई होते, ना वाहतूक पोलिसांकडून. मात्र त्याचा मनस्ताप सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. (Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik news)

शहराच्या मध्यवर्ती वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही. त्यातच पावसाळ्यात तर कोंडीची समस्या डोकेदुखी ठरते. कॉलेज रोड, गंगापूर रोड, महात्मा गांधी रोड, वकीलवाडी, मेन रोड, शालिमार चौक, स्मार्ट रोड, झेडपी रोड, रविवार कारंजा, तिडके कॉलनी, गोळे कॉलनी हा परिसर व्यावसायिकांची बाजारपेठ आहे.

या परिसरात व्यापारी संकुलही आहेत. जुन्या व्यावसायिक संकुलांच्या ठिकाणी पुरेशी पार्किंगची व्यवस्था नाही. काही संकुलांमध्ये तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे, परंतु त्याठिकाणी काही व्यावसायिकांनी गोदामासारखा वापर केला जातो तर काही ठिकाणी पार्किंग सोयीची नसल्याने त्याचा वापर होत नाही.

परिणामी, व्यापारी संकुलाच्या समोरच वाहने पार्क केली जातात. त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीला होतो आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या महात्मा गांधी रोड, वकीलवाडी, मेनरोड, स्मार्ट रोड, रविवार कारंजा या परिसरात होत असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik news
Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात पदोपदी पडणार ठिणग्या! राष्ट्रवादीपुढे उभारीचे जबरदस्त आव्हान

मध्यवर्ती बाजारपेठांमधील समस्येची डोकेदुखी कायम असताना, आता अशीच परिस्थिती शहरातील उपनगरीय परिसरात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलांसमोरही होऊ लागली आहे. त्यामुळे कॉलेज रोड, गंगापूर रोड, तिडके कॉलनी, कॅनडा कॉर्नर, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, सिडको, बिटको चौक, दिंडोरी रोड या परिसरातही वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले उभी राहिली आहेत.

बहुमजली व्यापारी संकुलांसाठी पुरेशा पार्किंगची व्यवस्था करणे आवश्‍यक असताना काही ठिकाणी पार्किंगची जागा अपुरी आहे. तर, बहुतांशी व्यापारी संकुलांमध्ये पे ॲण्ड पार्क करण्यात आलेले आहे. परिणामी काही मिनिटांसाठी येणाऱ्या वाहनचालकांकडून पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्याऐवजी संकुलासमोरील रस्त्यालगतच वाहने पार्क केली जातात.

या संकुलांमध्ये रोडफ्रंट दुकान आहेत. परंतु त्याठिकाणी दुकानमालकांचीच वाहने पार्क केली जातात, तर येणाऱ्या ग्राहकांना पे ॲन्ड पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्यास भाग पाडले जाते. त्याचा अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना बसतो आहे.

Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik news
Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

दुसरीकडे रस्त्यालगत पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होते आहे. याकडे महापालिका वा वाहतूक पोलिस शाखेकडून कोणतीही कारवाई होत नाही. परंतु त्याचा हकनाक मनस्ताप सर्वसामान्य नाशिककरांना सहन करावा लागतो आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड

सिटी सेंटर मॉलमध्ये वाहनतळ आहे, परंतु पैसे आकारले जातात. त्यामुळे बहुतांशी चारचाकी, दुचाकी वाहनचालक मॉलसमोर वा रस्त्यालगत वाहने अनधिकृतरीत्या पार्क करतात. येथील पे ॲन्ड पार्किंगवरून यापूर्वी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली परंतु मॉल व्यवस्थापन महापालिका प्रशासनाला जुमानले नाही.

याप्रमाणे शहरात नव्याने बहुमजली व्यापारी संकुल थाटली असून, याठिकाणी पे-ॲन्ड पार्किंग सुरू केली आहे. परंतु त्याठिकाणी वाहनचालक आपली वाहने अनधिकृतरीत्याच पार्किंग करतात. पे ॲन्ड पार्किंगच्या या प्रकारात सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र भुर्दंड बसतो आहे.

Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik news
Nashik Traffic Problem: शालिमार चौकाला रिक्षाचालकांचा विळखा! वाहतुकीला होतोय अडथळा

फुटपाथच झाले वाहनतळ

शहरातील बहुतांशी व्यावसायिक संकुलांमध्ये पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यालगतच्या फुटपाथवर पार्क केली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथच वाहनतळ झाल्याचे चित्र

जागोजागी दिसते. तिडके कॉलनी रोडवर मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये, व्यावसायिक संकुले थाटली आहेत. काही रहिवासी इमारतींमध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय चालतात आणि त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा आहे. परंतु त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या वाहनांना मात्र फुटपाथवर वाहने पार्क करावी लागतात. अनेकांची वाहने चोरीला गेल्याचे प्रकारही घडलेले आहेत

Problem of unauthorized parking in front of commercial complex nashik news
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com