Muslim Marathi Sahitya Sammelan| इस्लाममध्ये दहशतवादाची शिकवण नाही : प्रा. जावेदपाशा कुरेशी

Speaking at the Muslim Literature Conference, Prof. Javed Pasha Qureshi.
Speaking at the Muslim Literature Conference, Prof. Javed Pasha Qureshi.esakal

नाशिक : इस्लाममध्ये दहशतवादाची शिकवण नाही. प्रेम, एकतेचे संदेश देणारे साहित्य इस्लाममध्ये आहे. पहिले दहशतवादी साहित्य मनुस्मृती निर्माण झाले. साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद अडीच हजार वर्षांचा आहे, असे प्रतिपादन प्रा. जावेदपाशा कुरेशी यांनी केले. (Prof. Javed Pasha Qureshi statement on islam about terrorism at All India Muslim Marathi Literature Conference nashik news)

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात झालेल्या ‘साहित्य व सांस्कृतिक दहशतवाद’ विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

कुठल्याही हिंदू संतांनी मुस्लिमविरोधी साहित्य लिहिलेले नाही किंवा त्यांचे आचरणदेखील मुस्लिमविरोधी नाही. मनुस्मृतीने जातीयवादी साहित्य निर्माण करत दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही जावेदपाशा यांनी सांगितले. मुज्जफर सय्यद म्हणाले, की सांस्कृतिक दहशतवाद विकृत साहित्यातून झाला आहे.

विकृत इतिहासात अफजल खान मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने सर्वांवर अत्याचार केले, असे सांगण्यात आले आहे. खरा इतिहास कधी पुढे येऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर विश्वासू सैन्य होते. हे कधीही इतिहासात दाखवण्यात आलेले नाही.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Speaking at the Muslim Literature Conference, Prof. Javed Pasha Qureshi.
Nashik News : मोबाईल वापरताना काळजी घ्या : सूरज बिजली

सत्य बोलल्यावर मुस्लिमांवर अघोषित आणीबाणी लावली जाते. डॉ. मुस्तजिब खान म्हणाले, की राजकीय भावना तयार करण्यासाठी सांस्कृतिक दहशतवादाला सुरवात केली. भाषा, नाटकातील पात्र, टीव्ही मालिका यांच्यातून सांस्कृतिक दहशतवाद होत आहे.

राम पुनियामी म्हणाले, की भारतीय विविधता आणि संविधान धोक्यात आहे. राजकारण भारतीय परंपरेला अनुकूल नाही. देशाचे राजकारण भरकटत आहे. नारायण भोसले म्हणाले, की संस्कृत भाषा सर्वांसाठी नव्हती. भीती निर्माण करणे, असे वर्तन करणे म्हणजे दहशतवाद होय. तर

अली निजामुद्दीन म्हणाले, की मुस्लिम समाज एकसंध नाही. पंथीय जाणिवा निर्माण झाल्या. त्यांच्यात टोकाचे गैरसमज आहे. साहिल कबीर यांनी सांस्कृतिक क्षेत्रात मुस्लिमांना खलनायक केले आहे. हा दहशतवाद टिकून ठेवला. सांस्कृतिक दहशतवाद पेटला आहे, झिरपला आहे. त्याचप्रमाणे अन्वर राजन यांनी सुफी संतांनी इस्लाम धर्माची ओळख करून दिली आहे.

Speaking at the Muslim Literature Conference, Prof. Javed Pasha Qureshi.
नारोशंकरची घंटा : असा होतो आवाज बंद!

लोकभाषांना प्रतिष्ठा दिली. लोकभाषा, लोकसंस्कृती जोडली असे सांगितले. प्रा. मेहबूब सय्यद यांनी साहित्यिक समाजातील वास्तव मांडताना दिसत नाही. मुस्लिमांना विकृत करण्याची परंपरा सुरू आहे.

प्रजेची सत्ता असताना स्वातंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा फरक अजूनही लक्षात येत नाही. विशिष्ट समाजाला चिरडण्याचे षडयंत्र सुरू आहे. जाती धर्माच्या आधारे फूट पडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले.

Speaking at the Muslim Literature Conference, Prof. Javed Pasha Qureshi.
Shivputra Sambhaji Mahanatya : दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला इतिहासाचा अविस्मरणीय अनुभव!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com