esakal | मनोरुग्ण विवाहितेचा धक्कादायक प्रकार अन् परिसरात प्रचंड गोंधळ; पोलीसांची तत्परता
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

मनोरुग्ण विवाहितेचा गोंधळ अन् पोलिसांची तत्परता

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : आईच्या बोलण्याचा राग आल्याने शहरातील एका मनोरुग्ण असलेल्या विवाहितेने भ्रदकाली परिसरात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी तिने गॅस सिलेंडरची नळी काढल्याने परिसरात भितीचे वातावरण झाले. (promptness-of-police-stop-Psychiatric-married-woman-nashik-marathi-news)

.....आणि विवाहितेचे मानसिक संतुलन बिघडले

सोमवार पेठ भागात काही प्रमाणात मनोविकृत असलेली विवाहिता तरुणी तिच्या दोन वर्षीय चिमुकलीसह वास्तव्यास आहे. रविवारी रात्री तिने घरातील पाण्याचा नळ सोडून दिल्याने सोसायटीची पाण्याची टाकी रिकामी झाली. यामुळे सोसायटीमधील सदस्यांनी याची तक्रार विवाहितेच्या आईकडे केली. यानंतर आईने मुलीस मारले. याचा राग आल्याने विवाहितेचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिने घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून गॅस सिलेंडची नळी काढत घराचा दरवाजा आतून बंद केला. गॅसचा वास आल्याने सोसायटीमधील सर्व घाबरले. याचवेळी विवाहितेच्या आईने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र ऐनवेळेवर पोलिसांनी तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. रविवार (ता.४) रात्री सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तीन तासाच्या गोंधळानंतर तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

कक्षामार्फत भद्रकाली पोलीस ठाण्यात माहिती कळविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दत्ता पवार गुन्हे शोध पथकासह बीट मार्शल तसेच अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दार वाजवूनही तिने ते न उघडल्याने पोलिसांनी दार तोडत तिला बाहेर काढले. गॅस सिलेंडर बंद केला पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

मात्र एवढे होवूनही विवाहितेचा गोंधळ काही थांबत नव्हता. तिस समजावून सांगण्यास आलेल्या मावशीला देखील तिने मारहाण केली.पोलिसांच्या अंगावर देखील धावून जात होती. तब्बल दोन तास गोंधळ सुरू होता. महिला असल्याने पोलिसांना सक्ती करता येत नव्हती. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी निर्भया मोबाईल पथकास बोलावून घेण्यात आले. त्यांनाही तिला समजावून सांगण्यात अपयश आले. अखेर पोलिसांनी मावशीच्या मदतीने तिला जेवणाचे आमिष दाखवून समजावून सांगत शांत केले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अन्‌ हेलावले मन

मानसिक संतुलन बिघडल्याने आपण काय करत आहोत. याची जाण विवाहितेस होत नव्हती. तिच्या दोन वर्षीय मुलीची याचवेळी अवहेलना होत आहे. हे देखील तिला कळत नव्हते. चिमुकली सारखी रडत होती. पोलिसांनी तिला बिस्किट, पाणी दिले. तरीदेखील तिचे अश्रु थांबत नव्हते. हे दृश्य बघून पोलिसांसह गर्दी केलेल्या नागरिकांचे देखील मन हेलावून गेले.

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील २५ संशयितांना न्यायालयीन कोठडी

loading image