Nashik Water Shortage: ‘जायकवाडी’ला पाणी सोडल्याने संकट; 15 टक्के कपातीचा प्रस्ताव होणार सादर

water-shortage
water-shortage

Nashik Water Shortage : गंगापूर धरणातून मराठवाड्यातील ‘जायकवाडी’साठी पाणी सोडण्यात आल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेच्या आरक्षणात ७८६ दशलक्ष घनफूट कपात होण्याची शक्यता असून, त्यातून १५ टक्के पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे.

आठ दिवसांतून एकदा, तर ज्या भागात दोनदा पाणीपुरवठा केला जातो, तेथे एकवेळ पाणीकपात केली जाईल. तसा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मराठवाड्यात अपुरा पाऊस झाल्याने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. (proposal of 15 percent water reduction will be submitted nashik news)

जायकवाडी धरणातील पातळी ४५ टक्के असल्याने त्यानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून ‘जायकवाडी’साठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातून ०.५ टीएमसी, तर दारणा धरण समूहातून २.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाण्यातून शहरासाठी नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने १५ आॉक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी गंगापूर धरण समूहातून चार हजार ४००, दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून एक हजार ६०० असे एकूण सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी गंगापूर धरण समूहातून तीन हजार ८०७, दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून एक हजार ४०७ असे एकूण पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित केला आहे. त्यामुळे नाशिकच्या पाणी आरक्षणात तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट कपात झाल्याचे स्पष्ट होत आहे.

water-shortage
Jayakwadi Dam: गंगापूरचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास द्राक्ष बागा धोक्यात; जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध

त्यानुसार उपलब्ध साठ्यातून शहरासाठी १५ टक्के पाणीकपात केली जाईल. पाणीपुरवठा विभागाकडून बुधवारी (ता. २९) आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना प्रस्ताव सादर केला जाईल. गंगापूर धरण समूहातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडल्याने आरक्षणात कपात केली जाणार आहे. एमआयडीसी, एकलहरे औष्णिक वीज केंद्र व पाणीवापर संस्थांचे आरक्षण कमी होणार नसल्याचे दिसून येते.

महापालिकेची मागणी व प्रत्यक्ष मिळणारे पाणीआरक्षण (‘दलघफू’मध्ये)

धरण मागणी प्रत्यक्षात आरक्षण

गंगापूर धरण समूह ४,४०० ३,८०७

मुकणे १,६०० १,४००

दारणा १०० १००

एकूण ६,१०० ५,३१४

water-shortage
Nashik News: गंगापूरचा विसर्ग थांबला; 0.5 टीएमसी पाणी सोडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com