नाशिक : आयटी पार्क प्रस्तावाला अखेर मंजुरी; 10 कोटींची तरतूद | Nashik IT Park | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-municipal-corporation

नाशिक : आयटी पार्क प्रस्तावाला अखेर मंजुरी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : सत्ताधारी भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या आयटी पार्कला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. आडगाव शिवारातील आरक्षित जागेसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयटी पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनल वरील वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आडगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक ११०३ पैकी मधील दहा एकर जागेसह सर्व्हे क्रमांक ११०३, ११०१, ११०४, ११०५, ११०६, ११०९, १११०, ११११, १११२ व म्हसरूळ शिवारातील सर्व्हे क्रमांक ९३ ते ९५, ९७, ९८ व १०३ या ना विकास क्षेत्रात आयटी पार्कचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. उत्तर महाराष्ट्रातील माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित युवक देशभरातील अन्य शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. परंतु, नाशिकमध्ये पोषक वातावरण असूनही आयटी उद्योगाचा हवा तसा विकास झालेला नाही. महापालिका क्षेत्रात ३०० लहान- मोठ्या आयटी कंपन्या असून त्यांना सवलती मिळत नाही. नाशिकमधील मुलांना मुंबई, पुण्यात आयटी क्षेत्रातील कामासाठी जावे लागते. परंतु, घर परवडत नसल्याचा दावा करताना महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती माजी सभापती हिमगौरी आहेर- आडके यांनी प्रस्ताव सादर केला होता. विरोधकांकडून थेट विरोध झाला नसली तरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर संशय व्यक्त केला गेला. विश्‍वासात न घेतल्याने भाजपचे शशिकांत जाधव, उद्धव निमसे, शीतल माळोदे यांनी भाजपवरच पलटवार केला होता. दरम्यान, महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर अखेरीस महापौर कुलकर्णी यांनी अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

हेही वाचा: नाशिक : सुप्रिया सुळे - सीमा हिरे यांच्या भेटीने खळबळ

बचतीमधील रक्कम पार्क विकासासाठी

आयटी पार्कसाठी चालू अंदाजपत्रकात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षी बचतीमधील रक्कम पार्क विकसित करण्यासाठी लावली जाणार आहे. आयटी पार्कच्या जागेत तीस मीटरचे रस्ते विकसित करणे, मार्केट, शॉपिंग सेंटर, पाण्याची सुविधा, बस टर्मिनल आदी प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनलवरील विवेक जायखेडकर, विजय सांखला, धनंजय शिंदे, विजय अग्रवाल, नितीन कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

loading image
go to top