Nashik: मोदी सरकारच्या योजनांचा विकसित रथ नको, आमच्या शेतमालाला भाव हवा! उर्धुळ येथील शेतकऱ्यांची मागणी

Modi Government Vikasit Bharat Sankalp Rath File Photo
Modi Government Vikasit Bharat Sankalp Rath File Photoesakal

चांदवड : शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कुणाचीही ओरड नसताना कांद्याची टंचाई नसताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी का केली, पिकं विम्याचे पैसे कधी मिळणार, आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात?

तुमच्या योजना शेतकऱ्यांच्या काही कामाच्या नाही असं म्हणत चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथील शेतकऱ्यांनी आपल्या केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करीत गावांत आलेला मोदी सरकारचा विकसित भारतचा संकल्प रथ गावाबाहेर हाकलून दिला. (protest against modi vikasit bharat sankalp rath give price of agricultural products Demand of farmers from Urdhul chandwad Nashik)

केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही , कांद्याला भाव नाही . कांद्याला चांगला भाव मिळत असताना निर्यातबंदी लादली, असा आरोप यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी केला.

उर्धुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार करणारा रथ येऊन थांबला होता. त्यावेळी तेथे ग्रामस्थांची गदीं जमली. ग्रामस्थांनी तीव्र शब्दांमध्ये सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला.

शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आम्हाला लोककल्याणकारी योजनांबाबत माहिती देऊ नका,

आमच्या गावात सरकारच्या कोणत्याच योजनेचा प्रचार करू नका, असे सांगितले. कांद्याला अपेक्षित भाव मिळत असताना, केंद्र सरकारने निर्यातबंदी केली व त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला.

Modi Government Vikasit Bharat Sankalp Rath File Photo
Farmer News : कर्जमाफीच्या दोन्‍ही योजना ठरल्‍या कुचकामी; बॅंकेकडून कर्ज वसुलीचा तगादा कायम

दूध दरवाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. मात्र, त्याबाबत सरकार गप्प आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदींनी वारंवार केली. वास्तवात शेतकऱ्याला भिकेला लागण्याची वेळ आली आहे.

आम्ही शेतात पिकविलेल्या उत्पन्नाला मातीमोल भाव केवळ सरकारी धोरणामुळे मिळत असल्याचे ग्रामस्थांनी संबंधित वाहनचालक आणि ऑपरेटर व रथासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बजावले. ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केल्यामुळे व मोठ्या प्रमाणात लोक जमू लागल्यावर प्रचाररथ येथून घेऊन जावा लागला.

"शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी का केली? आम्हाला मोदी सरकारच्या योजना नाही, तर आमच्या शेतमालाला भाव हवा आहे."

- दत्तु मामा ठाकरे, शेतकरी, उर्धुळ ता. चांदवड.

Modi Government Vikasit Bharat Sankalp Rath File Photo
Farmer Protest : शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन! 'या' आहेत मागण्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com