सातपूर, नवीन नाशिक: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट २०२५ पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लागू केले आहेत, त्यामुळे भारतीय उद्योग, शेती या क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहेत. याचा येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करत ट्रम्प यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.