esakal | तब्बल 10 वर्षांनी ‘त्या’ आंदोलकांची निर्दोष मुक्तता!
sakal

बोलून बातमी शोधा

court

तब्बल 10 वर्षांनी ‘त्या’ आंदोलकांची निर्दोष मुक्तता!

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (जि.नाशिक) : तब्बल दहा वर्षे आणि आठ महिन्यांपूर्वी म्हणजेच १७ ऑगस्ट २०१० ला पाणीप्रश्नावरून (agitation for water) इंदिरानगरच्या बजरंग सोसायटीमध्ये महापालिका अधिकाऱ्यांना मंदिरात कोंडून जनआंदोलन (nashik muncipal corporation) करणाऱ्या तत्कालीन प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक (corporator) सुनील खोडे आणि इतर २३ जणांची त्या खटल्यातून सत्र न्यायालयाने (nashik court) निर्दोष मुक्तता केली. यात १७ महिलांचा समावेश आहे. दुर्दैवाने या आंदोलनात मंदिरात बंद केलेले महापालिकेचे उपअभियंता अनिल रणसिंगे आज हयात नाहीत.

कशासाठी होते हे आंदोलन?

आंदोलन करणाऱ्यांमधील मधुकर भालेराव, किसन इंगळे, सीमा सारंगधर आणि मंगला घोलप यांचे निधन झाले आहे. या भागातील पाणी समस्येला नागरिक वैतागले होते. त्यामुळे हनुमान मंदिराजवळ सगळे नागरिक विशेषतः नगरसेविका खोडे यांच्या नेतृत्वाखाली जमा झाले. (कै.) अनिल रणसिंगे, गोकुळ पगारे, पी. डी. पाटील, नरेंद्र शिंदे अधिकारी येथे पोचले. त्या वेळी संतप्त महिला आणि नागरिकांनी त्यांना मंदिरात कुलूपबंद करून आंदोलनाला सुरवात केली. वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि ठोस आश्वासन मिळाल्यानंतर त्यांची सुटका झाली. आंदोलनकर्ते खोडे यांच्यासह विलास देशमुख, बाळकृष्ण गायकवाड, दत्तात्रय देसाई, निर्मला वारे, पद्मिनी वारे, उषा देसाई, भारती झोपे, मंगला गायकवाड, सुवर्णा चांडोले, सुनीता कुलकर्णी, उज्ज्वला बोरुले, बेबी शेख, अलका राणे, कमल महाजन, भावना पाटील, पुष्पा इंगळे, कल्पना पाटील, वसुधा झोपे आणि संदीप जगझाप यांच्यावर इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. नाशिक येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश माधव शिंदे यांनी सर्वांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या आशयाची कोर्ट ऑर्डर बुधवारी सर्वांच्या हातात पडल्याने खऱ्या अर्थाने त्या जनआंदोलनाचा शेवट झाला.

हेही वाचा: Sakal Impact : प्रवाशांनो..पळवाटा शोधाल तर पडेल महागात!

कोणताही हेतू मनात नव्हता. महिला आणि नागरिकांच्या पाणीटंचाईमुळे झालेल्या त्रस्त मनःस्थितीतून हे आंदोलन झाले होते. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा किंचितही हेतू नव्हता. सर्वांची निर्दोष सुटका झाल्याने आनंद झाला आहे.-सुनील खोडे, तत्कालीन नगरसेवक

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?