Nashik News : वाचकाच्या बहुमूल्य वेळेची साहित्यिकांनी जाणीव ठेवावी

Mrudugandh Prakashan
Mrudugandh Prakashanesakal

नाशिक : हंगाम बदलत राहतात, त्यानुसार निसर्गातही अकल्पित असे बदल होतात. ग्रामिण साहित्यिकांनी या बदलांचे सतत निरीक्षण केले पाहिजे. तद्‌वतच आपण वाचकांचा बहुमूल्य वेळ घेत असतो, याची जाणीवही साहित्यिकांना असायला पाहिजे. खरे तर काव्यनिर्मिती ही ईश्‍वरी देण आहे, परंतु ही देणं केवळ एका ओळीपुरतीच असते.

बाकीची कलाकुसर आपल्यालाच करावी लागते आणि निरीक्षण नसेल तर ते शक्य होत नाही. त्यामुळे निसर्ग कवी, ग्रामिण साहित्यिक यांनी निरीक्षण हे केलेच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामिण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी येथे केले. (Publication of poetry collection Mrudgandha Bahar Nashik News)

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Mrudugandh Prakashan
Municipal Corporation News : महापालिकेच्या आयुक्तांबाबत आज निर्णय

पुणे येथील वैशाली प्रकाशनतर्फे डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘मृदगंधाचा बहर’ या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते अध्यक्षस्थानी होते. विवेक उगलमुगले, शकुंतलाबाई वाघ, रवींद्र मोरे, प्रकाशक विलास पोतदार, निसाकाचे कार्यकारी संचालक शांताराम सातभाई व निवृत्त शेतकी अधिकारी उत्तमराव जाधव व्यासपीठावर होते.

कवी, अभिनेता राजेंद्र उगले यांनी अभ्यासपूर्ण प्रास्ताविक व स्वागत केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. मिठे यांनी ‘मृदगंधाचा बहर’ या संग्रहातील कवितांमध्ये वास्तवता आहे. उदाहरणच द्यायचे तर यातील ‘बळीराजा’ या कवितेत शेतकरी जीवनाला व्यक्त केलेले आढळते. बळीराजाचे हाल यामध्ये उत्कटपणे मांडले आहेत.

या संग्रहातील एकूणच कविता या शेतीमातीशी इमान राखणाऱ्या आहेत, असेही त्यांनी या वेळी नमुद केले. प्रकाशक श्री. पोतदार, श्री. उगलमुगले, श्रीमती वाघ, कवयित्री डॉ. सौ. सातभाई, श्री. मोरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. सुदेश सादडे, मीनाक्षी जाधव, प्राचार्य सी. पी. कुशारे, श्री. देवरे, सुदाम सातभाई, अर्जुन वेलजाली, अशोक माळोदे आदींसह मान्यवर या वेळी उपस्थित होते. कविता बिरारी यांनी आभार मानले.

Mrudugandh Prakashan
SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com