Nashik Bus Accident
esakal
नाशिक : 'आई, मुलाखत झाली आहे... सकाळी घरी येतो,' असे सांगत सोमवारी (ता. १३) रात्री आईशी प्रेमाने बोललेला वेदांत देवीदास येवले याचा आवाज पुन्हा कधीच ऐकू आला नाही. उजाडणाऱ्या सकाळी घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या २२ वर्षीय तरुणाला पहाटेच काळाने गाठले. येवला-नांदगाव राज्य मार्गावरील सोमठाण जोश घाटात झालेल्या भीषण बस अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आणि मेहुणबारे गावावर शोककळा पसरली.