Railway
sakal
नाशिक रोड: ‘जीएमआरटी’ला (जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण) बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीडचा लोहमार्ग रद्द केला. ‘जीएमआरटी’पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून आता नवीन लोहमार्ग होणार आहे. पुणे ते नाशिक लोहमार्ग हा दोन टप्प्यात होत आहे. यात पुणे ते अहिल्यानगर हा सुमारे १३३ किलोमीटरचा लांबीच्या मार्गासाठी सुमारे ८ हजार ९७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. हा मार्ग सध्याच्या रस्ते महामार्गाला समांतर असणार असून चाकणमार्गे नवीन दुहेरी मार्गिका असणार आहे.