Nashik Drug Case : पुणे पोलिसांनी केली ‘भूषण’सह स्पॉटव्हिजीट; पुणे, मुंबई पोलिस नाशिकमध्ये तळ ठोकून

Drugs
Drugsesakal

Nashik Drug Case : उत्तर प्रदेशातून अटक केलेला एमडी ड्रग्जस्‌चा सप्लायर भूषण पाटील व साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना घेऊन पुणे पोलिस शिंदेगावात येऊन गेल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

गेल्या आठवड्यात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड हद्दीतील शिंदेगावातील एमडी ड्रग्जस्‌ बनविण्यात येणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला होता. पुणे पोलिसांनी दोघा संशयितांना याठिकाणी प्रत्यक्ष आणून चौकशी केल्याचे समजते.

पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जस्‌ माफिया ललित पाटील गेल्या महिन्यात पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता. तेव्हा राज्यभरातील पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. (Pune Police spot visit with Bhushan in nashik md drug case)

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेगावातील एका गोदामसदृश्य कारखान्यावर छापा टाकत सुमारे ३०० कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. त्यापाठोपाठ नाशिक पोलिसांनी दोन कारवाया केल्या.

दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या गुन्हेशाखेने ललित पाटीलचा भाऊ व ड्रग्जस सप्लायर भूषण पाटील व त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना उत्तरप्रदेशातून अटक केले. दोघेही नेपाळमध्ये पलायन करण्याच्या तयारीत असताना अटक केली. प्राथमिक चौकशीतून भूषण हा ललित येरवडा कारागृहात असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्याच्या इशाऱ्यानुसार एमडी ड्रग्जस्‌चे रॅकेट चालवत होता तर अभिषेक हा आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे समोर आले आहे.

याच चौकशीच्या माध्यमातून पुणे पोलिस भूषण व अभिषेक या दोघांना घेऊन नाशिकरोडच्या शिंदेगावात येऊन गेल्याचे समजते. याठिकाणी प्रत्यक्ष कामकाजाची माहितीबाबत चौकशी केल्याचे समजते. या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचीही माहिती पुणे पोलिसांनी घेतल्याचे समोर येते आहे. या पथकांनी मोठ्याप्रमाणात रोकड व सोन्याचा ऐवजही जप्त केल्याचे समजते आहे.

Drugs
Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणात एकमेकांवर चिखलफेक, मूळ विषय बाजूला : पालकमंत्री भुसे

मोठ्या साखळीची शक्यता

पुणे आणि मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या तपासातून एमडी ड्रग्जसची मोठी साखळी लवकरच उघड होण्याचे संकेत मिळत आहेत. या टोळीत कोण-कोण आहेत, यासह कच्च्या मालाचा पुरवठादार, ड्रग्जस्‌ची निर्मिती, त्याचे होणारे वितरण आणि आर्थिक उलाढाल या साखळीचा पोलिस शोध घेत आहेत.

मुंबई आणि पुणे पोलिसांची गोपनीय पथके नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाशिक पोलिसांनीही याप्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून आणखी काही नावे समोर येत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात एमडीप्रकरणात मोठा खुलासा होण्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.

Drugs
Nashik Drug Case: सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन! प्रतिमेला मारले जोडे; MD प्रकरणाला राजकीय वळण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com