Pune University News : पुणे विद्यापीठाने पुरस्‍कार, सुवर्णपदकासाठी मागविले नामनिर्देश

Pune University
Pune Universitysakal

Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुणवंत विद्यार्थी तसेच भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक, पुरस्‍काराने सन्‍मानित केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध पदक, पुरस्‍कारांसाठी विद्यापीठाने नामनिर्देश मागविले आहे.

या संदर्भात प्राचार्यांनी आपल्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रस्‍ताव सादर करण्याच्‍या सूचना विद्यापीठाने दिल्‍या आहेत. त्‍यासाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली. सुवर्णपदकासाठी पदव्‍युत्तर पातळीवर एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा प्रस्‍ताव मागविला आहे. (Pune University invites nominations of students for award gold medal nashik news)

अटी-शर्तींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्‍ताव विद्यापीठाच्‍या शैक्षणिक प्रवेश विभागाकडे सादर करण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत.

विद्यापीठाशी संलग्‍नित महाविद्यालय, विद्यापीठ विभागातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्‍युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्‍या विद्यार्थिनीला दरवर्षी त्‍यागमूर्ती श्रीमती सरस्‍वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक प्रदान केले जाते. २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्वोत्‍कृष्ट विद्यार्थिनीस विद्यापीठाच्‍या पदवीप्रदान समारंभात हे सुवर्णपदक दिले जाणार आहे.

पुरस्‍कारासाठी पात्रताधारक विद्यार्थिनींची माहिती सादर करण्याच्‍या सूचना विद्यापीठाने प्राचार्यांना दिल्‍या आहेत. विज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्‍युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्‍या विद्यार्थ्यांना ह. भ. प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार, रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलार मामा सुवर्णपदक प्रदान केले जाते.

Pune University
UGC NET Exam 2023 : यूजीसी-नेट डिसेंबर सत्र नोंदणीची 28 पर्यंत मुदत

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेव्‍यतिरिक्‍त पदव्‍युत्तर अभ्यासक्रमातील सर्वोत्‍कृष्ट विद्यार्थ्यास हा पुरस्‍कार दिला जाणार आहे. या पुरस्‍कारासाठी विद्यार्थ्यांच्‍या संपूर्ण तपशीलवार माहितीबरोबर आवश्‍यक कागदपत्रे, शिफारस ३१ ऑक्‍टोबरपर्यंत विद्यापीठाच्‍या शैक्षणिक प्रवेश विभागात सादर करण्याचे सूचित केले आहे.

वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थ्यांनाही संधी

विद्यापीठातर्फे दिला जाणारा दि प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉ. शंकरदयाळ शर्मा सुवर्णपदक या पारितोषिकासाठी वाणिज्‍य विद्याशाखेतील विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांची शिफारस करण्याचे आवाहन विद्यापीठाने प्राचार्यांना केले. हे पारितोषिक पदवी परीक्षेच्‍या शैक्षणिक गुणवत्तेनुसार दिले जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

Pune University
Nashik ZP News : बांधकाममध्ये ठराविकांना प्रतिनियुक्तीवर घेण्याचा घाट; विभागातून 50 लाखांची फाईल गायब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com