
NMC News : महापालिका अधिकाऱ्याकडून मनपा ठेकेदारावरच दंडात्मक कारवाई!
जुने नाशिक : महापालिका पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षकाकडून महापालिका बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारची बहुधा पहिलीच कारवाई असावी. (Punitive action against municipal contractor by municipal officer NMC News)
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
विनयनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर महापालिका बांधकाम विभाग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळण्यात आला. परिसरातील सजग नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला.
त्यांनी पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाचे अधिकारी सुनील शिरसाट यांना माहिती दिली. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मोकळ्या भूखंडावर कचरा जाळल्याचा आढळून आले. त्यांनी कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी महापालिका ठेकेदाराचे कर्मचारी असल्याचे सांगितले.
श्री. शिरसाट यांनी कुठल्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता संबंधित ठेकेदार विशाल विधाते यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल केला. प्रत्यक्षात कारवाई झाल्यानंतर त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.