Nashik : गुणवत्ता विभागाची अशीही Adjustment; चेंबरच्या प्लास्टरमधूनही हातचलाखी

NMC News
NMC News esakal

नाशिक : खोदकाम करताना खडक लागला नाही तरी तो दाखविणे, रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम असतानाही त्या कामाला गुणवत्तेच्या चौकटीत बसविणे, ढिसाळ कामांना मंजुरी देणे, मापांमध्ये फेरफार करणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून आणखीन एक प्रताप समोर येत आहे. शहरात बांधल्या जाणाऱ्या चेंबरला आतून बाहेरून प्लास्टर करणे आवश्यक असताना प्लास्टर झाल्याचे दर्शवून बिले काढण्यास मंजुरी दिली जात आहे. (quality department sanctioning incompelete work on paper without recognizing work done Nashik News)

गेल्या दोन अडीच वर्षात रस्त्यांवर जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची सुमार गुणवत्ता समोर आली. या सर्व प्रकाराला गुणवत्ता व नियंत्रण विभाग कारणीभूत आहे. या विभागात नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी टक्केवारीचा दर वाढविल्याने मेटाकुटीला आलेल्या ठेकेदारांनीदेखील कामात बॉम्बे हात मारून आपले ईप्सित साध्य करून घेतले.

गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या कामांना वेळीच ब्रेक लावून प्रामाणिकपणे काम केले असते, तर नाशिककरांचे कष्टाचे पैसे ठेकेदारांच्या घशात गेले नसते. परंतु गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडूनच टक्केवारीसाठी चुकीच्या कामांना प्रोत्साहन मिळाल्याने त्यातून नाशिककरांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक रोड, सामनगाव, जेहान सर्कल अशा विविध भागातून रस्त्याच्या रस्ते वाहून गेले असताना गुणवत्ता विभागाने नेमकी गुणवत्तेची कुठली चाचणी घेतली, असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे.

NMC News
Nandurbar : धडगांव नगरपंचायतमध्ये दुकानाच्या समोरच कचऱ्याचा ढीग!

गुणवत्ता विभागाच्या उंबऱ्याला कुंकू

गुणवत्ता व नियंत्रण विभागात यापूर्वी अस्तित्वात नसलेली टक्केवारी सुरू झाल्याने त्यातून गुणवत्तेचे गणित बिघडले. कोणत्याही कामाचे बिल काढायचे झाल्यास गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून खुलेआम व तीही वाढीव टक्केवारी वसुली सुरू आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या उंबऱ्याला कुंकू वाहिल्याशिवाय बिल अदा केले जात नाही. गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आयटीआय किंवा नॉन टेक्निकल लोक तपासणी करतात.

चेंबर करताना आतून- बाहेरून प्लास्टर करणे गरजेचे असते. मात्र, शहरात ही कामे करताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या सगळ्यावर गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचे पूर्ण लक्ष असणे अपेक्षित आहे. खोदाईचे काम करताना मोठ्या प्रमाणात ऍडजेस्टमेंट करून कंत्राटदारांसाठी महापालिकेचा गुणवत्ता नियंत्रण विभाग काम करतो. खोदकाम करताना पाण्याच्या पाइपलाइन टाकताना खडक- मुरुमाच्या प्रमाणात ऍडजेस्टमेंट केली जाते.

NMC News
Lumpyमुळे जनावरे Quarantine; संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com