Lumpyमुळे जनावरे Quarantine; संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाय

 lumpy disease News
lumpy disease Newssakal

खामखेडा (जि. नाशिक) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभर लॉकडाऊन पाहायला मिळाला. आता गाय, बैल व म्हैसवर्गीय जनावरांना ‘लम्पी’ या संसर्गजन्य आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे आता अशी जनावरे एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी देखील जनावरांनाच क्वारंटाईन केले आहे.

आपले जनावर शेजारच्या जनावरांकडे जाऊ दिले जात नाही. मागील पंधरवड्यापासून जनावरांचा बाजार, वाहतूक करणे, नवीन जनावर खरेदी करण्यावर शेतकऱ्यांनी बंदी केली आहे. (Quarantine cattles due to Lumpy Measures taken by farmers to prevent infection Nashik Latest Marathi News)

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत गोवंश व म्हैसवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. प्राण्यांमधील संक्रमण, सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रणासाठी लम्पी चर्मरोगाबाबत राज्यातील बराच भाग नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे.

त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतूक होऊ नये, बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, लम्पी रोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी- विक्रीवर देखील अनेक जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

 lumpy disease News
Nashik : खानगावला शाळेसमोरच अनधिकृत बांधकाम सुरू; प्रशासनाची टोलवाटोलवी

लम्पी रोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने- आण करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. बाधित प्राण्याच्या संपर्कात इतर जनावरे जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महिनाभरापासून ग्रामीण भागातील बैल खरेदी- विक्रीचे व्यवहार मंदावले आहेत.

देवळा तालुक्यासाठी २७ हजार लस प्राप्त झाल्या होत्या. शंभर टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी दहा गटांची स्थापना करण्यात आली असून, १०० टक्के लसीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युद्धस्तरावर लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती देवळा तालुका पशुधन विकास अधिकारी एस. जी. पजई यांनी दिली.

 lumpy disease News
Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्याच्या शेडमध्ये तरुणाचा खून; संशयित ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com