
Radhakrishna Game : नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील साडेसात हजार युवक-युवती आपल्या कला, संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घघाटन होणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात राज्यातील मंत्रिमंडळासह केंद्रीय युवक व कल्याण मंत्री सहभागी होतील. (Radhakrishna Game statement of Branding of Nashik through National Youth Festival nashik news)
युवा महोत्सवानिमित्ताने नाशिक शहराचे देशपातळीवर ‘ब्रॅण्डींग’ होत असून या संपूर्ण सोहळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकूण ६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास गर्ग व नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत युवा महोत्सवाची माहिती दिली. तब्बल १६ वर्षांनी महाराष्ट्राला युवक महोत्सवाचा मान मिळाला आहे.
नाशिकमध्ये प्रथमच हा सोहळा होत असल्याने स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक अशा दोन पातळीवर त्याचे नियोजन सुरु आहे. पंचवटीतील मोदी मैदानासह महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कला दालन, कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह आणि गंगापूर रोडवरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदोजी महाराज म्युझियममध्ये १३ ते १५ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक राज्यातून १०० युवक-युवती व त्यांचे सहकारी असे एकूण साडेसात हजार व्यक्ती नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था १२८ हॉटेल्समध्ये केली असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र बसेस राहतील. विशेष म्हणजे हनुमान नगरमध्ये महायुवा ग्राम साकारले आहे. यातून सुविचारांचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.
महायुवा एक्सो अंतर्गत महाराष्ट्र देशाला काय देवू शकतो, या विचारांतून आर्ट कल्चर, सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, पर्यावरण, हेल्थ ॲण्ड वेलनेस, ॲडव्हेंचर स्पोर्ट या पाच गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शहराचे ब्रॅण्डींग होत असल्याने शहरासह ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त गमे व क्रीडा आयुक्त डॉ.गर्ग यांनी सांगितले.
मिर्ची चौक ते मोदी मैदानापर्यंत रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगर रोडवरील मिर्ची चौक ते साधुग्राम मैदानावरील सिटी लिंक बसडेपोपर्यंत हा रोड शो असेल. रस्त्याच्या बाजूला नागरिकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
नाशिकमधील ६०० युवकांचा सहभाग
युवा महोत्सवात कला, सांस्कृतिक, वत्कृत्व, कथा लेखन आदी स्पर्धा होत आहेत. तसेच बिगर स्पर्धात्मक कार्यक्रम होत असल्याने यात नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांचे ६०० युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे. महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयांना सुटी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी बुधवारी (ता.१०) जाहीर करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.