खुनाच्या आरोपाखाली रहीम शेखला जन्मठेपेची शिक्षा

खुनाच्या आरोपाखाली रहीम शेखला जन्मठेपेची शिक्षा
Published on: 
खुनाच्या आरोपाखाली रहीम शेखला जन्मठेप सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ३ : जुन्या वादातून फैसल खान अमानुल्ला खान याच्यावर चाकूने वार करून खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने शेख रहीम शेख रज्जाक ऊर्फ रहीम भजीया (रा. कमालपुरा, मालेगाव) याला अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौंड यांच्या न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शेख सलीम शेख याकूब ऊर्फ सलीम चमडा याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. कमालपुरा भागात २१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फैसल खान याच्याशी शेख रहीमने जुन्या वादाची कुरापत काढून वाद घातला. त्याच्यासोबत शेख माजीद शेख रज्जाक ऊर्फ माजीद भजीया आणि सलीम शेख याकूब ऊर्फ सलीम चमडा होते. माजीदने फैसलला पाठीमागून पकडून ठेवले. रहीमने चाकूने फैसलवर वार केला. सलीमनेही त्याच्यावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकूच्या वारामुळे फैसल गंभीर जखमी झाला. नागरिकांनी भांडण सोडविताना रहीमला पकडून ठेवले. अन्य संशयित तेथून पसार झाले. फैसलला प्रथम नूर हॉस्पिटल आणि नंतर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फैसलचा भाऊ इम्तियाज खान अमानुल्ला खान यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयितांना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. खटला सुरू असतानाच शेख माजीद शेख रज्जाक याचा मृत्यू झाला. सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील संजय सोनवणे यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने दहा साक्षीदार तपासले. आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने रहीम शेखला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सलीम शेखची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com