esakal | रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या बॅगा लुटणारी परराज्यातील टोळी गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

railway police tracked down a gang stealing passengers bags from a train

रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या बॅगा लुटणारी परराज्यातील टोळी गजाआड

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : पाडळी देशमुख (ता.इगतपुरी) रेल्वे स्थानकावर गाडी उभी असताना जून महिन्यात महिला प्रवाशांच्या पर्समधून ५८ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या परराज्यातील टोळक्याचा लोहमार्ग पोलिस ठाणे इगतपुरी यांनी शोध लावला आहे. संबंधित चार संशयित आरोपींना रविवारी (ता.५) अटक करण्यात आली. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांच्या या कामगिरीचे सगळीकडे कौतुक होत आहे.

फिर्यादी संगिता अरुण दुबे (वय ४८, रा. रीवा निपानिया मध्यप्रदेश), सहफिर्यादी सिमाकुमारी ललीतेश्वर प्रसाद (वय ४१, रा. पटना, बिहार) हे २३ जूनला डाऊन ट्रेन पाटलीपुत्र एक्सप्रेसने एलटीटी कुर्ला ते सतना व पटना असा प्रवास मध्य रेल्वेने करीत होते. पाडळी देशमुख स्थानकाजवळ गाडी थांबलेली असताना अनोळखी संशयिताने फिर्यादी व सहफिर्यादी यांची डोक्याखाली ठेवलेली लेडिज पर्समधील ५८ हजार रुपये जबरीने हिसकावून चोरून नेली. याबाबत त्यांनी फिर्याद इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिली.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलिस ठाणे, भरुच (गुजरात) येथील दाखल गुन्ह्यात अटकेतील संशयित दीपक महेंद्रसिंग प्रजापती (वय २२, रा. टोहना, जि. फतेहबाद, हरियाणा), सुखविर महेंद्र वाल्मीक (वय २१, हरियाणा), सन्नी ऊर्फ सोनी पुरण फुल्ला (वय ३०, हरियाणा), राहुल चेनाराम धारा वाल्मीकी (वय २६, रा. हरियाणा) यांची अधिक चौकशी केली असता पाडळी देशमुख जवळ पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये रेल्वे स्टेशन दरम्यान चोरी केल्याची कबुली दिली. घटनास्थळाचा डाटा प्राप्त केला असता यातील संशयित आरोपी यांनी वापरलेल्या मोबाइलचे ट्रेस झाले. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी कोटा (राजस्थान) येथून संशयितांना ताब्यात घेतले. या टोळीच्या म्होरक्याचा इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक सोपन भाईक, उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, राजेश सोनवणे, हेमंत घरटे, संतोष परदेशी, निरज शेंडे, प्रमोद पाहाके, भाऊसाहेब गोहील, सतीश खरडे, अमोल निचत, योगेश पाटील, रमेश भालेराव, नितीन देशमुख, धनंजय नाईक, भूषण उके, तुषार मोरे आदी शोध घेत आहेत.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील १२९ पैकी ८३ कोरोना बाधित ग्रामीणमधील

loading image
go to top