Latest Marathi News | कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यानच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या रद्द; जाणुन घ्या गाड्यांची स्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Information News

Nashik News : कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यानच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या रद्द; जाणुन घ्या गाड्यांची स्थिती

नाशिक : कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान ३ जानेवारी पासून सुरू असलेल्या ब्लॉकमुळे ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर १५ गाड्या सोलापूर विभागातील कोपरगाव यार्डच्या दुहेरी मार्गाच्या कामासाठी वळवण्यात आल्या आहेत.

३ ते २३ जानेवारी असा २० दिवसा पर्यंत हा ब्लॉक चालणार असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. (Railway trains canceled due to block between Kopargaon and Kanhegaon Information about status of trains Nashik News)

हेही वाचा: Nashik News : पंचवटी, सिडकोत 200 खाटांचे रुग्णालय; NMCचे 55 कोटींचे 2 प्रस्ताव!

1) ब्लॉकमुळे गाडी क्रमांक -22147 - दादर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस 06.01.2023, 13.01.2023 आणि 20.01.2023 रोजी दादरहून सुटणारी गाडी आणि परतीची -22148 - साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस 07.01.2023, 14.01.2023 आणि 21.01.2023 रोजी साईनगर शिर्डीहून सुटणारी रद्द करण्यात आली आहे.

2) ट्रेन क्रमांक -12131 - दादर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस JCO तारीख - 23.01.2023 दादरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

4 गाडी क्रमांक -12132 - साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस JCO दिनांक - 24.01.2023 साईनगर शिर्डीहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

5) गाडी क्रमांक-01135 – भुसावळ – दौंड मेमू जेसीओ दिनांक-05.01.2023, 12.01.2023 आणि 19.01.2023 भुसावळहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

6) गाडी क्रमांक-01336 – दौंड – भुसावळ MEMU JCO दिनांक-05.01.2023, 12.01.2023 आणि 19.01.2023 रोजी दौंडहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

7) गाडी क्रमांक -11039 - कोल्हापूर - गोंदिया एक्सप्रेस JCO तारीख -21.01.2023, 22.01.2023 आणि 23.01.2023 कोल्हापूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

8) ट्रेन क्रमांक -01336 - गोंदिया - कोल्हापूर एक्सप्रेस JCO दिनांक - 21.01.2023, 22.01.2023 आणि 23.01.2023 - गोंदियाहून सुटणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती

मार्ग बदललेल्या गाड्या

ट्रेन क्रमांक 12782 निजामुद्दीन – 23.01.23 रोजी निघणारी म्हैसूर संत हिरादरम नगर, मकसी, नागदा, रतलाम, वडोदरा, वसई, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे म्हैसूरला जाईल.

2) 22.01.23 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12130 हावडा-पुणे नागपूर, बल्लारशाह, काझीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला जाईल.

३) ट्रेन क्रमांक १७२०६ काकीनाडा – २३.०१.२३ रोजी सुटणारी साईनगर शिर्डी सिकंदराबाद, वाडी, दौंड, पुणतांबा मार्गे साईनगर शिर्डीला जाईल.

4) गाडी क्रमांक 22846 हटिया - पुणे 22.01.23 रोजी सुटणारी गाडी नागपूर, बल्लारशाह, काझीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला जाईल.

५) ट्रेन क्रमांक १२१०३ पुणे – २४.०१.२३ ला सुटणारी लखनौ लोणावळा, कर्जत, पनवेल, वसई वडोदरा, रतलाम, नागदा, संत हिरादरम नगर मार्गे लखनौला जाईल.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड

6) ट्रेन क्रमांक 17205 साईनगर शिर्डी - 24.01.23 रोजी सुटणारी काकीनाडा पुणतांबा, दौंड, वाडी, सिकंदराबाद मार्गे काकीनाडाला जाईल.

7) ट्रेन क्रमांक 12147 कोल्हापूर - 24.01.23 रोजी सुटणारी निजामुद्दीन ट्रेन पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, वसई वडोदरा, रतलाम, नागदा, संत हिरादरम नगर, भोपाळ मार्गे निजामुद्दीनला जाईल.

8) ट्रेन क्रमांक 22141 पुणे-नागपूर 19.01.23 रोजी सुटणारी गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण इगतपुरी, मनमाड मार्गे लखनौला जाईल.

9) ट्रेन क्रमांक 22142 – नागपूर – पुणे – 20.01.23 रोजी सुटणारी ट्रेन मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला जाईल

10) ट्रेन क्रमांक 22139 पुणे अजनी - 21.01.23 रोजी सुटणारी ट्रेन लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे अजनीला जाईल.

11) गाडी क्रमांक 22140 अजनी - पुणे - 22.01.23 रोजी सुटणारी गाडी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला जाईल.

12) गाडी क्रमांक - 22117 पुणे - अमरावती - 18.01.23 रोजी सुटणारी गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, मार्गे अमरावतीला जाईल.

13) ट्रेन क्रमांक 22118 पुणे - अमरावती - 19.01.23 रोजी सुटणारी गाडी मनमाड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी मार्गे पुण्याला जाईल.

14) गाडी क्रमांक 22123 पुणे - अजनी - 20.01.23 रोजी सुटणारी गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे अजनीला जाईल.

१५) गाडी क्रमांक २२१२४ – अजनी – पुणे – २४.०१.२३ रोजी सुटणारी गाडी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला जाईल.

हेही वाचा: Nashik Crime News : गावठी कट्ट्याने मारून केली दुखापत; दोघा संशयितांना अटक

टॅग्स :Nashikrailwaykopergaon