

Devotees struggle through muddy paths and heavy traffic at Saptashrungi Temple as rain fails to dampen their faith.
Sakal
-दिगंबर पाटोळे
वणी (नाशिक) : आदिमाया सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांंची पर्वणी साधत लाखो भाविक तीर्थाटनासाठी गडावर हजेरी लावत असून चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवा प्रमाणेच गडाला दिवाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गेल्या तीन दिवसांत गडावर अडीच लाख भाविकांनी तर रविवारी दिवसभरात ९० हजारावर भाविक देवीचरणी नतमस्तक झाले. दरम्यान घाट रस्त्याचे सुरु असलेले काम व गेल्या तीन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी यामूळे भाविंकाची तारांबळ उडत असून गावांतर्गत रस्ते व घाट रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने भाविकांचे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.