Monsoon
sakal
नाशिक: जिल्ह्यात सहा महिन्यांपासून सातत्याने पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाने सर्वसामान्य बेजार, तर दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मेपासून आजतागायत एकूण १,१०७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २५८.२ मिमी पाऊस झाला. ऑक्टोबरमध्ये ९२.४ मिमी पाऊस झाला असून, ऑक्टोबरच्या सरासरीच्या तुलनेत १६६.२ टक्के इतके हे प्रमाण आहे.