
मनसेच्या भोंग्याने आपचा आवाज बंद
नाशिक : कधी काळी महापालिकेत (NMC) सत्ता असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) शहरातील ताकद क्षीण होत चालली असताना आम आदमी पक्षाने (AAP) चांगली गती घेतली होती. मशिदींवरील भोंग्यासह अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाच्या निमित्ताने मनसे पुन्हा एकदा चर्चेत आल्याने ‘भोंग्या‘ च्या आवाजाने ‘आप' चा आवाजच बंद झाल्याचे चित्र आहे.
भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख असल्या पासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नाशिकशी (nashik) संबंध आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सेनेच्या शाखा उघडण्याच्या निमित्ताने कायम नाशिकमध्ये राबता राहायचा. युतीची सत्ता आल्यानंतरही शिवउद्योग सेनेची सूत्रे राज यांनी नाशिकमध्येचं ठेवली. २००२ मध्ये महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता आल्यानंतरही नाशिकमध्ये राज यांची ये-जा होतीच. राज यांच्या संकल्पनेतूनचं गोदा पार्क साकारण्यात आला.
सन २००५ मध्ये शिवसेना (Shiv Sena) सोडून स्वतंत्र सवता सुभा उभारताना राज यांना नाशिककरांची मोठी साथ मिळाल. त्याअनुषंगानेचं २००७ च्या निवडणुकीत महापालिकेत बारा तर २०१२ च्या निवडणुकीत चाळीस नगरसेवक निवडून दिले. त्यापुर्वी २००९ मध्ये राज्यात बारा आमदार निवडून आले. त्यापैकी तीन आमदार नाशिक शहरातील होते.
परंतू संघटनात्मक पातळीवर तसेच सत्तेच्या राजकारणात योग्य ताळमेळ घालता आला नाही. त्यात मोदी लाट आल्याने सर्वचं पक्ष भुईसपाट झाले त्यात मनसे एक होती. पाच पर्यंत नगरसेवकांची संख्या घटल्याने वाढ होईल असा कुठलाचं कार्यक्रम आखला गेला नाही.
हेही वाचा: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; मनसेच्या गोटात घडामोडींना वेग
महत्वाच्या विषयावर जी काही आंदोलने झाली, ती पक्षाच्या राजगड कार्यालयाच्या आवारापुरतीचं मर्यादीत राहिली. त्यामुळे महापालिकेच्या पुढील निवडणुकीमध्ये नगरसेवक घटण्यावरचं अधिक चर्चा झाली. या परिस्थिती मध्ये नागरिकांना नवीन पर्याय म्हणून आम आदमी पक्षाने शहरात काही प्रमाणात उचल खाल्याचे दिसेल. त्यात पंजाब राज्यात पुर्ण बहूमताने मिळालेली सत्ता व गोवा राज्यात दोन आमदार निवडून आल्याने आम आदमी पक्षाचा सत्तेच्या राजकारणातील विस्तार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हेही वाचा: राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ?, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या
भोंग्यासमोर आवाज क्षीण
मनसे बॅकफुट वर जात असताना शहराच्या राजकारणात मनसेची पोकळी भरून काढण्यासाठी आम आदमी पक्षाच्या पदाधिकायांनी नियोजन केले होते. परंतू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंगावर भगवी शाल पांघरताना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्याबरोबरचं राज्यातील मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा पाठ म्हणण्याची घोषणा केल्याने राजकारणाच्या सर्व चर्चा राज ठाकरे यांच्या भोवतीचं केंद्रीत झाल्याने आम आदमी पक्षाचा निर्माण होत असलेल्या प्रभाव आता क्षीण झाल्याचे दिसून येत आहे.
Web Title: Raj Thackrey Mns Stand On Bhonga Affcted To Aam Admi Party Nashik Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..