Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनासाठी सजल्या बाजारपेठा! राख्यांचा ट्रेंड बदलतोय

Women buying rakhi.
Women buying rakhi.esakal

Raksha Bandhan 2023 : बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

या पाश्र्वभूमीवर इगतपुरीसह घोटी शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. लाडक्या भावाच्या पसंतीची राखी घेण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी होत आहे, तर बहिणीसाठी भेटवस्तू खरेदीसाठी भावांची भरपावसात दमछाक होत आहे. (Raksha Bandhan 2023 Markets decked up for Raksha Bandhan trend of rakhis changing nashik)

रक्षाबंधन बुधवारी (ता. ३०) आहे. यामुळे बाजारपेठेत रंगीबेरंगी आणि आकर्षक, दोन रुपयांपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत.

राखीचा आकार आता छोटा झाला असून, त्यावर केलेले आकर्षक नक्षीकाम, गुजरात, राजस्थानची संस्कृतीची छटा असणाऱ्या राख्या आवडीने घेतल्या जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Women buying rakhi.
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनादिवशी होणार दुर्लभ योग; या चूका करणं महागात पडेल!

साधा रंगीत दोरा आणि त्याच्या मध्यात प्लॅटिनम, अक्रेलिक किंवा धातूपासून बनवलेले डिझाइनची राखी अनेकांना भुरळ घालत आहे. त्यात ओम, स्वस्तिक, सरस्वती, सूर्य, अशा अनेक नक्षी पाहायला मिळतात.

बच्चे कंपनीसाठी कार्टून राखी

बच्चे कंपनीची आवड हेरून यंदा मोटू-पतलू, छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन, शिनचॅन कार्टून्स कॅरेक्टर्सच्या आणि स्पिनरच्या राख्यांनी आणि बँड्सनी बाजारपेठा सजल्या आहेत. पूर्वी दादा नावाच्या राख्या मिळत. आता त्याची जागा ‘कूल ब्रो’ने घेतली आहे.

Women buying rakhi.
Raksha Bandhan Special Laddu : रक्षा बंधनाला भावाला विकतची नाही तर घरची मिठाई खाऊ घाला, वाचा रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com