Raksha Bandhan Special Laddu : रक्षा बंधनाला भावाला विकतची नाही तर घरची मिठाई खाऊ घाला, वाचा रेसिपी

आज आपण रक्षा बंधनासाठी खास घरच्या घरी झटपट लाडू कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊया.
Raksha Bandhan Special Laddu
Raksha Bandhan Special Laddu esakal

Raksha Bandhan Special Recipe : रक्षा बंधन हा बहीण भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा भारतीय सण आहे. रक्षा बंधनाला बहीण भावाला ओवाळते आणि काहीतरी गोड पदार्थ त्याला खाऊ घालते. बऱ्याच जणांच्या घरी या सणासाठी खास गोड पदार्थ बनवले जातात. तुमच्या काही कामांच्या व्यापात मात्र तुमचे गोड पदार्थ बनवायचे राहून गेले असतील तर चिंता करू नका. आज आपण रक्षा बंधनासाठी खास घरच्या घरी झटपट लाडू कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

आज आपण मूग दाळीचा टेस्टी लाडू कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

मूग डाळीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप मूग डाळ

पाव कप बारीक केलेली साखर

बारीक कापलेले ड्राय फ्रूट्स (Recipe)

Raksha Bandhan Special Laddu
Rakhi Special Laddu Recipe: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी बनवा चविष्ट मूग डाळीचे लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

मूग डाळीचे लाडू बनवण्याची योग्य पद्धत

मूग डाळीचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मूग डाळ टाकून ती किंचीत सोनेरी होऊ द्या. आता ही दाळ थंड होऊ द्या. डाळ थंड झाल्यावर ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आता दाळीचे लाडू बनवण्यासाठी परत एकदा डाळीचे बारीक केलेले मिश्रण १० मिनिटे पॅनमध्ये भाजून घ्या. आता हे सुद्धा थंड होऊ द्या.

आता त्यात बारीक केलेली साखर आणि बारीक केलेले ड्राय फ्रूट्स आणि तूप या मिश्रणात चांगले मिक्स करून घ्या. आणि त्याचे लाडू बनवा. (Food)

लाडूला गार्निश करण्यासाठी त्यावर ड्राय फ्रूट्स चिकटवा. तुमचे टेस्टी मूग दाळीचे लाडू तयार आहेत.

रक्षा बंधनाच्या दिवशी तुमच्या भावाला हे लाडू खाऊ घाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com