Ram Navami 2023 : कुष्ठपीडितांच्या वसाहतीत रंगला श्रीराम जन्मोत्सव; ढोल ताशांच्या गजरात पालखी

Devotees doing bhajan
Devotees doing bhajanesakal

पंचवटी (जि. नाशिक) : सियावर रामचंद्र की जय ...जय श्रीराम.. अशा घोषणा आणि गीतांच्या जयघोषात पंचवटीतील वाल्मीकनगरमधील कुष्ठपीडित बांधवांच्या वसाहतीतही गुरुवारी (ता. ३०) रामजन्मोत्सव रंगला.

गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत अखंड वीणावादन सुरू होते. गुरुवारी दुपारी बाराच्या ठोक्याला वाजता ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ असे पाळणागीत म्हणत राम जन्मोत्सवाला सुरवात झाली. (Ram Navami 2023 Shri Ram Janmotsav in leprosy colony nashik news)

माजी नगरसेविका रूपाली गावंड- शेट्टी यांच्यासह परिसरातील महिला भाविकांनी पाळणा हलवित यात सहभाग घेतला. भाविकांकडून ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘पवनसुत हनुमान की जय’, असा घोष करण्यात आला. शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

सायंकाळी सव्वासात वाजता ढोल ताशांच्या गजरात श्रीराम मंदिरापासून पालखी निघाली. काट्या मारुती पोलिस चौकीपासून सुरू झालेली पालखी पुढे गुरुद्वारा रोड, गजानन चौकमार्गे वाल्मीकनगर येथे परतली. या वेळी श्रीरामनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

या वेळी कार्यक्रमस्थळी आमदार राहुल ढिकले, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, उल्हास धनवटे, नरेश पाटील, ज्ञानेश्वर बोडके, हर्षल पटेल, स्वप्नील नन्नावरे, पद्माकर पाटील, नंदू पवार, डॉ. गौरव बच्छाव, श्याम लोंढे, माजी नगरसेविका सरिता सोनवणे, रूपाली गावंड- शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे, किरण सोनवणे हिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुष्ठपीडित संघटनेचे भालचंद्र निरभवणे, रवी पाटील, बाबूराव गावंड, कृष्णा वानखेडे, बाबू चिता, विजू हाटकर, सचिन पाटील, कुणाल पाटील, छबू गावंड, पांडुरंग गोळे, राजू वाखारे, विलास पाटील, सचिन पाटील, श्याम शिंपी, रमेश ढोले, रवी पाटील, भरत गुंजाळ, भारत पुरोहित, हरिभाऊ निरभवने, प्रशांत वालेकर आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Devotees doing bhajan
Dada Bhuse: प्रशासकीय सेवेमध्ये शेतकऱ्यांची मुले दाखल होताहेत याचा सर्वाधिक आनंद : दादा भुसे

क्रिकेट स्पर्धा रंगल्या

जन्मोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत ३० संघांनी सहभाग घेतला होता. यात नाशिक येथील संघाने २१ हजार १ रुपये रोख व चषक असे प्रथम पारितोषिक पटकाविले. ट्रॉम्बे येथील दत्तनगर मित्रमंडळ संघाने १५,००१ व चषक असे दुसरे पारितोषिक, कोंढवा संघाने तिसरे पारितोषिक रोख ११००० व चषक, चौथे पारितोषिक सोलापूर पाच हजार एक रुपये व चषक या संघाने पटकाविले.

मंदिर परिसरात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वर्षीदेखील कुष्ठपीडितांच्या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कल्याण, मुलुंड, बोरिवली, ट्रॉम्बे, पुणे कोंढवा, फुगेवाडी (पुणे), मिरज, सोलापूर, अमरावती जिल्ह्यातील कुष्ठपीडितांच्या कॉलनीतून प्रत्येकी तीन टीम असे जवळपास एकूण ११०० जणांची कार्यक्रमास हजेरी लावली.

Devotees doing bhajan
Nashik News : ज्योती जाधवची पुन्हा एकदा चमकदार कामगिरी; राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासाठी ब्रांझ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com