Ram Navami 2023 : आज श्रीराम जन्मोत्सव; संस्थानतर्फे तयारी पूर्ण

Kalaram Mandir
Kalaram Mandiresakal

नाशिक : गुरुवारी (ता.३०) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री काळाराम संस्थानतर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांच्या मुख्य मंदिराच्या पूर्व दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. यंदाचे पूजेचे मानकरी समीरबुवा पुजारी यांच्याहस्ते महापूजा व श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडेल. (Ram Navami 2023 Shri Ram Janmotsav today Preparation completed by kalaram mandir trust nashik news)

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता मंदिराचे दरवाजे खुले होतील. त्यानंतर साडेपाच वाजता महंत सुधीरदास पुजारी यांच्या हस्ते काकड आरती सकाळी सात वाजता यंदाचे पूजेचे मानकरी समीरबुवा पुजारी यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर श्रींना नवीन वस्त्रे व पारंपारिक दागिन्यांचा शृंगार केला जाईल.

बारा वाजता समीरबुवा पुजारींच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव होईल. तत्पूर्वी सकाळी १० ते १२ दरम्यान नंदकुमार जोशी यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन होईल. सायंकाळी सात वाजता पुजारी परिवारातर्फे श्रींना अननकोट नैवेद्य अर्पण केला जाईल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Kalaram Mandir
State Level Cricket Tournament : नाशिकचा एक डाव 9 धावांनी मोठा विजय!

रात्री आठ वाजता हेमंत पुजारी यांच्याहस्ते शेजारती होईल. रामभक्त संपत धात्रक यांच्या परिवारातर्फे पाच हजार बुंदीच्या पाकिटांसह पाण्याचे वाटप करण्यात येईल. देवस्थानातर्फे जन्मोत्सवानंतर पाचशे किलो प्रसादाचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती धनंजय पुजारी यांनी दिली.

मंदिराकडे जाणारे रस्ते बंद

दरम्यान श्रीराम जन्मोत्सवामुळे मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत पोलिसांनी या भागातील वाहतुकीचे नियोजन केले आहे.

त्यानुसार सरदार चौक ते श्रीकाळाराम देवस्थानपर्यंचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय पूर्व दरवाजा, उत्तर दरवाजा येथील वाहतुकीस मज्जाव करण्यात आला आहे.

Kalaram Mandir
Ram Navami : गा बाळांनो श्री रामायण! अमेरिकेत रामनवमी निमित्त बाळगोपाळांनी सादर केले गीत रामायण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com