Ramzan | महिलांसाठीच्या विशेष बाजारात रमजानच्या खरेदीची धूम

Ramadan shopping at special womens market in Malegaon Nashik News
Ramadan shopping at special womens market in Malegaon Nashik Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान ईद (Ramzan Eid) अवघ्या १२ दिवसांवर आल्याने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. विशेषत: महिला खरेदीसाठी घराबाहेर पडू लागल्या आहेत. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी आहे. येथील गांधी मार्केट, अंजुमन चौक, सरदार मार्केट, इक्बाल डाबी, रमजान पुरा आदी ठिकाणी भरणाऱ्या विशेष बाजारात महिलांची रमजानच्या खरेदीची धूम आहे. बाजारात महिलांचे कपडे, बुरखा, बांगड्या, पर्स, कानातील इयररिंग, चप्पल, कडे व इतर सौंदर्यप्रसादने खरेदीकडे कल आहे. विशेष बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने महिलांसाठी सोयीचे ठरत आहे. या बाजारातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

शहरातील गांधी मार्केट, अंजुमन चौक व बुनकर बाजारात महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहरात गांधी मार्केट १९९८, तर अंजुमन चौकात १९६० पासून बाजार सुरू झाले. या तिन्ही बाजारपेठेत स्वस्त व चांगल्या दर्जाचे कपडे व इतर वस्तू मिळतात. गांधी मार्केटमध्ये कपड्यांची व इतर ३५० ते ४०० दुकाने आहेत. अंजुमन चौकातही १०५ दुकाने आहेत.

येथील गांधी मार्केट व अंजुमन चौकातील बाजारात मुस्लिम महिलांबरोबरच हिंदू महिलाही खरेदीसाठी येतात. या तिन्ही बाजारात जळगाव, भुसावळ, चोपडा, औरंगाबाद, कन्नड, सिल्लोड, शिरपूर, शिर्डी, जालना, संगमनेर, नगर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा आदी ठिकाणाहून लहान व्यावसायिक खरेदीसाठी येतात. शहरासह कसमादे भागातील बहुतेक महिला कपडे व सौंदर्य प्रसाधने घेण्यासाठी या बाजारपेठा गाठतात.

Ramadan shopping at special womens market in Malegaon Nashik News
Exam Alert : YCMOU च्‍या परीक्षा अर्जासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

अंजुमन चौकात रमजानसाठी चायना (China) व दक्षिण कोरिया (South Korea) येथील पर्स, हेयर क्लीप, काटे, फॅन्सी आयरिंग आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. कॉस्मेटिकचा माल मुंबई, तर हातातील कडे जयपूर, हैदराबाद व दुल्हन साहित्य राजकोटहून मागविण्यात येते. अहमदाबाद, सुरत आदी ठिकाणाहून कपड्याचा माल मागविण्यात येतो. ४०० पासून ते दोन हजार रुपयांपर्यंत ड्रेस उपलब्ध आहेत. महागाईने महिलांच्या कपडे व सौंदर्यप्रसाधनाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. वस्तू महाग झाल्या, तरी सण असल्याने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फारूक शेख व युसूफ शेख यांनी सांगितले.

Ramadan shopping at special womens market in Malegaon Nashik News
Cricket : महिला T-20 स्‍पर्धेत मायाची भेदक गोलंदाजी; टिपले 4 बळी

रमजानच्या खरेदीला रात्री प्राधान्य

रमजानचे रोजे सुरू असल्याने महिला, पुरुष सर्वच जण रात्रीच्या खरेदीला पसंती देत आहेत. मालेगावचा पारा ४३ अंशावर असल्याने दिवसा बाजारपेठांमध्ये फारशी गर्दी दिसत नाही. महिलांच्या विशेष बाजारात गर्दी होत असल्याने पोलिसांनी बॅरिकेट लावून रिक्षा, दुचाकी आदी वाहनांना मज्जाव केला आहे. या बाजारपेठांमधील बहुसंख्य दुकानात प्रामुख्याने महिला कामगार आहेत. यातून अनेकांना रोजगार मिळत असल्याचे अलमदिना फैन्सी स्टोअर्सचे संचालक अन्सारी कामरान अहमद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com