esakal | आश्चर्यकारक! रमजानमध्ये 'ते' चक्क १०० ट्रक केळी करणार फस्त??
sakal

बोलून बातमी शोधा

ramdan 123.jpg

मालेगावला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, रोज नवीन रुग्ण आढळत आहेत. रमजानपर्वात फळे, बेकरी पदार्थ, भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तू प्रशासनाकडून पुरविल्या जात आहेत. ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला व फळे महामार्गावरील स्टार हॉटेलजवळ येतात. तेथून छोट्या वाहनांनी माल शहरात आणला जातो.

आश्चर्यकारक! रमजानमध्ये 'ते' चक्क १०० ट्रक केळी करणार फस्त??

sakal_logo
By
गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : रमजानपर्वात शहरातील पूर्व भागात विविध फळांची चांगली विक्री होत आहे. कोरोनामुळे शहरात कर्फ्यू व लॉकडाउन असल्यामुळे यंत्रमागसह सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे टरबूज, केळी अशी कमी किमतीची फळे घेण्याकडेच नागरिकांचा कल आहे. यातही केळीला सर्वाधिक मागणी असून, रमजानपर्वात मालेगावकर तब्बल शंभर ट्रक केळी फस्त करणार आहेत. 

सर्वच फळांना मागणी, बाजारपेठेतील गर्दी चिंताजनक 
मालेगावला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, रोज नवीन रुग्ण आढळत आहेत. रमजानपर्वात फळे, बेकरी पदार्थ, भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तू प्रशासनाकडून पुरविल्या जात आहेत. ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला व फळे महामार्गावरील स्टार हॉटेलजवळ येतात. तेथून छोट्या वाहनांनी माल शहरात आणला जातो. शहरातील दहा ठिकाणी भरणाऱ्या विशेष बाजारात हातगाडीद्वारे मालाची विक्री होत आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच, या वेळेत भरणाऱ्या बाजारामध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. नेमकी हीच गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे. 

असे आहेत फळांचे भाव 
सफरचंद ः 200 रुपये (प्रतिकिलो) 
टरबूज : 12 ते 15 रुपये 
खरबूज : 25 ते 30 रुपये 
पपई : दहा ते 15 रुपये 
चिकू : 40 रुपये 
अननस : 30 ते 40 रुपये नग 

जळगावची केळी लोकप्रिय 
शहरात 30 ते 35 फळांचे घाऊक विक्रेते आहेत. यातील दहा ते 15 व्यापाऱ्यांनी रमजान सुरू होण्यापूर्वीच कच्ची केळी आणली आहेत. शहरातील विविध भागात असलेल्या गुदामात त्या पिकविण्यासाठी ठेवल्या आहेत. या गुदामातूनच किरकोळ विक्रेत्यांना रोज माल दिला जातो. लॉकडाउनमुळे बहुतांशी नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. अशा कुटुंबीयांचा कल केळी खरेदीकडेच दिसून येत आहे. 

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. काही व्यापाऱ्यांनी रमजानपूर्वीच केळी आणून ठेवल्या आहेत. सामान्यांच्या आवाक्‍यात भाव आहे. त्यामुळे गरीब नागरिक केळी व टरबूज खरेदी करीत आहेत. - फकिरा शेख, 
संचालक, कृउबा मालेगाव 


रमजानपर्वात फळांची आवक चांगली आहे. खरबूज कमी येत आहेत. स्थानिक व्यापारी पुरेशी फळे बाजारात आणत आहेत. आगामी काळातही फळांचा तुटवडा जाणवणार नाही. - शिवकुमार आवळकंठे, 
तहसीलदार  

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​

loading image
go to top