esakal | Nashik Oxygen Leak : परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी; रामदास आठवलेंचा आरोप

बोलून बातमी शोधा

ramdas athavale

Nashik Oxygen Leak : परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी; रामदास आठवलेंचा आरोप

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनाबाबत राज्यातील परिस्थिती जास्त खराब आहे. राज्य सरकारने परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. योग्य नियोजन केले नाही असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट दिली. आठवले यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तेथील घटनेची माहिती घेतली. संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

आरोप करण्यापेक्षा उपचाराचा दिलासा द्या - आठवले

आठवले म्हणाले की, नाशिकची घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. पाठोपाठ आज विरारची घटनाही धक्कादायक आहे. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन आहे की, त्यांनी या दोन्ही घटनांची चौकशी करावी, या घटनेतील दोषींना शासन करावे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कोरोना बाधीतांच्या कुटुंबाना योग्य नातेवाईकांना मिळावी ही अपेक्षा आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा रुग्णांना दिलासा द्या

खासदार आठवले म्हणाले की, राज्यसरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील मंत्र्यांनी विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा राज्यातील रुग्णांना कसा दिलासा देता येईल हा प्रयत्न करावा. राज्यसरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य नियोजन केलं नाही. केंद्राचे हातपाय पडण्याची गरज नाही, नियोजन करा, लोकांना दिलासा द्यावा कोरोना नियंत्रणासाठी केंद्रसरकारही उपाययोजना करतंय असही स्पष्ट केले.