रमेश मंडलिक खून प्रकरण : मोक्कातील संशयितांना कोठडी

ramesh mandalik murder case
ramesh mandalik murder caseesakal

नाशिक : आनंदवलीतील रमेश मंडलिक खून प्रकरणात (ramesh mandalik murder) संशयितांविरुद्ध पोलिसांनी मोक्का कारवाई केल्यानंतर यास विशेष न्यायालयाने मान्यता दिली असून, मोक्का तपासास आणखी ४५ दिवसांचा कालावधी देत अटक असलेल्या ११ संशयितांपैकी दहा जणांना २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Ramesh Mandlik murder case)

रमेश मंडलिक खून प्रकरण

आनंदवली येथे शेती असलेले रमेश मंडलिक यांचा फेब्रुवारी महिन्यात खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असाताना जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पुढे आली होती. प्रत्यक्षात मंडलिक यांचा खुनामागे अनेक जण असल्याने या खुनाचा उद्देश लक्षात घेत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या महिन्याच्या सुरवातीलाच सदर टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित कायद्यानुसार कारवाई करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

ramesh mandalik murder case
दिलासादायक! शहरात कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

कट करून खून

मंगळवारी (ता. १८) हे प्रकरण विशेष जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या समोर सुनावणीसाठी आले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी सरकारपक्षातर्फे बाजू मांडत या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा तपास करणे, सदर टोळी विरुद्ध असलेल्या इतर गुन्ह्यांबद्दल माहिती घेणे व या प्रकरणांमध्ये त्यांचे आलेले संबंध, त्यांनी मिळविलेली संपत्ती इत्यादी गोष्टींचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचे वडील रमेश मंडलिक यांचा कट करून खून केलेला आहे व हा भाग संघटित गुन्हेगारी असल्याकारणाने त्याबाबत सखोल तपास आवश्यक आहे. सदर टोळीचे इतर सदस्य फरारी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे, तसेच आरोपींनी बनावट दस्तऐवज करून मिळकती हडप करणे, खंडणी असे गंभीर गुन्हे केलेले असून, प्रथमदर्शनी आरोपींनी गेल्या दहा वर्षांमध्ये बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलेले असून, संघटित गुन्हेगारी व टोळीच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते गुन्हे करत आहेत. त्यांचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने सदरच्या गुन्ह्याचा तपास मोक्कांतर्गत करण्यासाठी आजपासून ४५ दिवस मुदत वाढून देत संशयित आरोपींना २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com