Ramzan Eid 2023 : रमजान पर्वास उद्यापासून प्रारंभ

Ramzan Eid News: बुधवारी (ता.२२) चंद्रदर्शन घडले नसल्याने शुक्रवार (ता.२४) पासून रमजान (Ramzan Eid 2023) पर्वास सुरवात होणार आहे.
Nashik Ramdan Eid 2023 News
Nashik Ramdan Eid 2023 Newsesakal

जुने नाशिक : बुधवारी (ता.२२) चंद्रदर्शन घडले नसल्याने शुक्रवार (ता.२४) पासून रमजान (Ramzan Eid 2023) पर्वास सुरवात होणार आहे. यामुळे मुस्लिम बांधवांकडून तयारी वेग आला आहे. (ramzan eid 2023 Ramadan will begin from 24 march nashik news)

इस्लाम कालगणनेनुसार शाबान महिन्याच्या उर्दू २९ तारखेस चंद्रदर्शन होण्याची दाट शक्यता असते. दर्शन घडल्यास दुसऱ्या दिवसापासून रमजान पर्वास सुरवात होते. बुधवारी शाबान महिन्याची उर्दू २९ तारीख असल्याने सर्वच मुस्लिम बांधवांनी सायंकाळी चंद्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

छत, टेरेस, उंच इमारती, मशीद परिसरात चंद्रदर्शनासाठी गर्दी केली होती. चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता.२३) उर्दू शाबन महिन्याचे तीस दिवस पूर्ण होत असल्याने शुक्रवारी पर्वाचा पहिला रोजा असणार आहे.

रोजा सहेरी आणि इफ्तारसाठी आवश्यक विविध वस्तू, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडूनदेखील बुधवारी दुकाने थाठण्यास सुरवात केली होती.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Nashik Ramdan Eid 2023 News
NMC Tax Recovery : करवसुलीवर विकासकामांचे भवितव्य; वसुलीसाठी अवघे 8 दिवस शिल्लक

दूध बाजार परिसरात इफ्तार बाजार भरत असल्याने या ठिकाणी दिवसभर दुकाने उभारण्याचे काम सुरू होते. शहराच्या विविध मशिदीमध्ये तरावीहच्या विशेष नमाज निमित्ताने मशिदीची स्वच्छता करण्याच्या कामास वेग आला होता. तरुणांकडून पूर्णपणे स्वच्छता करण्यात येऊन नमाजासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली.

रमजान पर्वास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. मुस्लिम बांधवांमध्ये शुक्रवारचे अनन्य साधारण महत्त्व आहे. छोटी ईदचा दिवस म्हणून ओळखला जातो. अशा पवित्र दिवशी पवित्र रमजान पर्वाचा पहिला रोजा असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

यंदा रमजान पर्वात ५ शुक्रवार येत आहे. तर योगायोगाने शेवटच्या शुक्रवारी रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे. यामुळे मुस्लिम बांधवांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

Nashik Ramdan Eid 2023 News
Gudhi Padwa Festival : ‘ऑटोमोबाईल’ मध्ये 30 कोटींची उलाढाल! गुढीपाडव्‍याचा साधला मुहूर्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com