Nashik Crime News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime against girl

Nashik Crime News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल

नाशिक : तरुणीचा पाठलाग करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच दोन वेळा पीडितेचा गर्भपातही केला.

याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयित जोहेब जाफर खान (२५, रा. हरिकिरण अपार्टमेंट, विहीतगाव, नाशिक रोड) याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कारासह ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rape of young woman with lure of marriage case registered under Atrocity Nashik Crime News)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Jalgaon Crime News : 10 वर्षांची कमाई चोरल्याने घर घेण्याचे स्वप्न भंगले!

पीडितेच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२० पासून संशयित खान हा पीडितेचा पाठलाग करून संशयिताने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर स्वत:च्या घरी व इतर ठिकाणी नेऊन अत्याचार केले.

तसेच अत्याचार करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. सदरचे रेकॉर्डिंग सोशल मीडियात अपलोड करण्याची धमकीही दिली. लग्न करण्याचे आमिष दाखवून दोन वेळा गर्भपाताच्या गोळ्या देत जबरदस्ती गर्भपात केला.

संशयित फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार