नाशिक बाजार समितीत ३४४ ॲन्टिजेन टेस्टमध्ये अवघे ४ पॉझिटिव्ह

Corona Test
Corona TestMedia Gallery
Summary

नाशिक बाजार समिती प्रवेशद्वारावरच ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येत असून, आजपावेतो २४४ टेस्ट झाल्या आहेत. यात अवघे ४ जण पॉझिटिव्ह आढळले.

म्हसरूळ (जि. नाशिक) : बाजार समिती प्रवेशद्वारावरच ॲन्टिजेन टेस्ट (Antigen test) करण्यात येत असून, आजपावेतो ३४४ टेस्ट झाल्या आहेत. यात अवघे ४ जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांना पुढील उपचारासाठी मेरी येथील कोरोना सेंटरमध्ये (Corona centre) पाठविले जात आहे. (4 Corona positive patient found in 244 antigen test at nashik market committee)

प्रवेशद्वारावरच टेस्ट सुरू

नाशिक बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांची मनपाच्या माध्यमातून मंगळवार (ता.२५) पासून ॲन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे.नाशिक बाजार समितीत शहरासह जिल्हाभरातून पालेभाज्यांची आवक होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवार (ता.२३) पासून निर्बंध शिथिल करीत नियमाचे पालन करीत बाजार समित्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बाजार समिती व महापालिकेच्या माध्यमातून बाजार समितीतील सेल हॉल क्रमांक एकमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट (Rapid antigen test) सुरू केली होती. मात्र शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारी (ता.२६) प्रवेशद्वारावर टेस्ट सुरू करण्यात आल्या. गुरुवार (ता.२७) पावतो एकूण ३४४ टेस्ट झाल्या असून, यात अवघे ४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Corona Test
कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना ब्रेक! मे महिन्यात अवघी एक नोंदणी

रस्त्यावर शेतमाल विक्री सुरूच

अनेक शेतकरी बाजार समितीत प्रवेश करीत नाहीत. अजूनही अनेकजण दिंडोरी रोडवरील बाजार समितीलगत रस्त्यावर व शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड समोर पेठरोडवरच शेतमाल विक्री करताना दिसतात. यामुळे आता बाजार समिती समोरील रस्त्यांवर गर्दी दिसू येत आहे. यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल मातीमोल भावात विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार बाजार समितीतच शेतमाल विक्री करावा, जेणेकरून त्यांची फसवणूकही टळेल आणि लूटही थांबेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.

Corona Test
नाशिक शहरात अवघे ५ टक्के लसीकरण पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com