Nashik Dengue Disease: डेंगीच्‍या बदलत्‍या स्वरूपाने धोक्‍याची घंटा; रुग्‍णसंख्येत झपाट्याने वाढ

dengue
dengueesakal

Nashik Dengue Disease : सामान्‍य परिस्‍थितीतील डेंगीच्‍या लक्षणांपेक्षा अधिक घातक स्‍वरूपाची लक्षणे सध्याच्या रुग्‍णांमध्ये आढळत आहेत. वैद्यकीय स्‍थिती झपाट्याने खालावल्‍याने रुग्‍णांना हॉस्‍पिटलमध्ये दाखल करावे लागते. रुग्‍णसंख्येतही वाढ होत असून, मृतांचा आकडा चिंतेत टाकणारा बनत चालला आहे.

डेंगीच्‍या या बदलत्‍या स्वरूपाने धोक्‍याची घंटा वाजविली असून, वैद्यकीय यंत्रणा चक्रावली आहे. प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविताना आजाराच्‍या बदलत्‍या स्‍वरूपाचा ठाव घेण्याचे दुहेरी आव्‍हान जिल्‍हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. (rapid increase in number of cases due to changing forms of dengue nashik news)

गेल्‍या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात डेंगीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शासकीय रुग्‍णालये तसेच खासगी रुग्‍णालयांमधील अत्‍यवस्‍थ विभागात निदान झालेले अनेक रुग्‍ण उपचार घेत आहेत.

अचानक डेंगी रुग्‍णसंख्येत झालेली वाढ संपूर्ण यंत्रणेला कोड्यात टाकणारी ठरत आहे. तसेच, सामान्‍य परिस्‍थितीत आढळणाऱ्या डेंगी रुग्‍णांमधील लक्षणापेक्षा अनेक पटींनी घातक स्‍थिती सध्या आढळून येते. आधीच कोरोना महामारीचा सामना करताना सर्वसामान्‍यांना संघर्ष करावा लागला होता. त्‍यात परिस्‍थिती सावरत असताना आरोग्‍याचे नवे आव्‍हान निर्माण झाले आहे.

डेंगी की कोविड, याबाबत संभ्रम

काही तज्‍ज्ञांच्‍या निरीक्षणानुसार पूर्वी कुटुंबात एखाद्या व्‍यक्‍तीला डेंगीचे निदान व्‍हायचे; परंतु सध्या संपूर्ण कुटुंबाच्‍या सदस्‍यांना डेंगीचे निदान होत आहे. त्यामुळे कोविडचे स्‍मरण होत असून, त्‍याच्‍याशीच साधर्म्य असलेला आजार तर उद्‍वभलेला नाही, असा सवाल उपस्‍थित केला जात आहे.

बदलाबाबत नोंदविलेली निरीक्षणे

पूर्वी डेंगी रुग्‍णात ताप, अंगदुखी, चेहऱ्यावर सूज आल्‍यावर शरीरातील प्‍लेटलेट कमी व्‍हायच्‍या. विषाणू रुग्‍णाच्‍या विविध अवयवांवर हल्‍ला चढवायचे; परंतु सध्या डेंगीचे निदान होत असलेल्‍या रुग्‍णांची वैद्यकीय स्‍थिती अवघ्या दोन-तीन दिवसांत खालावते आहे.

dengue
Dengue Disease : एका रुग्णाला आयुष्यात 4 वेळा होऊ शकतो डेंगी; समज-गैरसमजाविषयी वाचा सविस्तर

तसेच, घटलेले प्‍लेटलेटचे प्रमाण रक्‍तपिशवी देऊनही अतिशय संथ गतीने वाढत आहे. दुसरीकडे हृदयासह इतर अवयवांवर झपाट्याने विषाणूंचा प्रादुर्भाव होत असून, यामुळे रुग्‍णाच्‍या हृदयाचे ठोके वाढणे, अत्‍यवस्‍थ वाटण्यासारखे प्रकार वाढलेले आहेत.

मृतांमध्ये कमी वयाच्‍या रुग्‍णांचे प्रमाण अधिक

डेंगी किंवा डेंगीसदृश आजाराने सध्या मृत पावत असलेल्‍या रुग्‍णांमध्ये चाळिशीच्‍या आतील रुग्‍णांचे प्रमाण अधिक राहत आहे. यासंदर्भात तज्‍ज्ञांचे मत जाणून घेतले. त्‍यांच्‍या म्‍हणण्यानुसार कमी वयाच्‍या रुग्‍णांना यापूर्वी गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेला नसतो.

अशात या विषाणूकडून झपाट्याने हल्‍ला चढविला जात असल्‍याने त्‍यास शरीर प्रतिकार करू शकत नाही. त्‍यामुळे असे रुग्‍ण दगावतात. तुलनेत वाढलेल्‍या वयातील रुग्‍णांमध्ये प्रतिकारक शक्‍ती निर्माण झालेली असते, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

"गेल्‍या काही दिवसांत डेंगीच्‍या रुग्‍णांचे प्रमाण वाढलेले आहे. लक्षणांमध्ये बदल नोंदविला असून, सध्या अधिक घातक लक्षणे आढळून येत आहेत. त्‍यामुळे गुंतागुंत वाढून परिणामी रुग्‍णालयात दाखल करायची वेळ ओढवते. परिस्‍थितीचे गांभीर्य पाहता रुग्‍णांनी लक्षणे आढळताच वेळ वाया न घालविता ज्‍येष्ठ डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली तातडीने उपचाराला सुरवात करीत संभाव्‍य गुंतागुंत टाळावी." - डॉ. शिरीष देशपांडे, ज्‍येष्ठ फिशिजियन

dengue
Nashik Dengue Disease: डेंगीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 90 बाधित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com