नाशिक शहरात कोरोना संसर्गाचा विस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test
नाशिक शहरात कोरोना संसर्गाचा विस्फोट

नाशिक शहरात कोरोना संसर्गाचा विस्फोट

नाशिक : शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून घरोघरी रुग्ण आढळून येत आहे. परंतु, बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने खरी आकडेवारी बाहेर येत नाही. त्यामुळे आता महापालिकेकडून रॅपिड ॲन्टिजेन(rapid antigen test) व आरटी- पीसीआर (RT-PCR Test) चाचणी करण्याची मोहीम आखली जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni)यांनी सांगितले. शहरात कोरोना(Corona) रुग्णांच्या संख्येत ७३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी घरोघरी कोरोना रुग्ण आढळून येत आहे.

हेही वाचा: नाशिक : महापालिकेतील मानधन भरती रेंगाळणार

२७ डिसेंबर २०२१ ते ते ११ जानेवारी २०२२ या पंधरवड्यात शहरात ७३ टक्के कोरोना रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत ७,६५१ रूग्ण आढळले त्यातील पाच हजार ५९५ रूग्ण महापालिका हद्दीतील आहेत. महापालिका व खासगी रुग्णालये, लॅब तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांवर उपचार केले जातात त्यातून आकडेवारी बाहेर येत आहे. प्रत्यक्षात शहरात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दर दोन ते पाच घरटी कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. रुग्णांचा खरा आकडा बाहेर येण्यासाठी महापालिकेकडून तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

अवघ्या पंधरा दिवसात झालेली ७३ टक्के रूग्णवाढ लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर नियमाचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी उपाययोजना गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.

शहरात कागदोपत्री कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक रुग्ण आहे. तपासणी अभावी तो आकडा बाहेर येत नाही. त्यामुळे तातडीने चाचणी करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top