Maharashtra PDS server down impact on ration card applicants
Sakal
नाशिक: शासकीय योजनांसाठी आवश्यक रेशनकार्ड हा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे नव्या रेशनकार्डसह दुरुस्तीसाठी हजारो अर्ज दाखल होत आहेत. पण, सरकारच्या ‘आरसीएमएस’ प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे अर्ज विलंबाने निकाली निघत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे सध्या दोन हजार २६९ अर्ज प्रलंबित असून, वेळेत रेशनकार्ड हाती लागत नसल्याने लाभार्थ्यांची परवड होत आहे.