नाशिक- पुरवठा विभागाने जिल्ह्यात राबविलेल्या शोधमोहिमेंतर्गत २१ हजार ६६१ शिधापत्रिकांवर मागील सहा महिन्यांपासून एकदाही धान्य उचल केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून या शिधापत्रिकांवरील धान्य पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे.