Nashik Cotton Crop Rate : पांढरे सोने खरेदीचा मुहूर्त हुकला; कापसाच्या उत्पादनात विक्रमी घट

Cotton News
Cotton Newsesakal

Nashik Cotton Crop Rate : दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या कापसाचे पीक दुष्काळात होरपळल्याने यंदा दसऱ्याला पांढरे सोने खरेदीचा मुहूर्त साधता आलेला नाही. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अद्याप कापसाची खरेदी सुरू झालेली नाही.

जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे. दुबार पेरणी करूनही बाजरी, मका, सोयाबीन यापैकी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. (Record decline in cotton production nashik news)

खरीप हंगामातील पिके हातातून गेली आहेत. कृषी विभागाने केलेल्या पीक पाहणीनुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किमान ६० ते शंभर टक्के पिकांचे नुकसान झाल्याची सरकारदप्तरी नोंद झाली आहे

तरीही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदगावचा समावेश न झाल्याने येथील राजकारण पेटले होते. राज्य सरकार येत्या दोन दिवसांत नव्याने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करणार आहे. त्यात नांदगावचा समावेश होण्याची अपेक्षा लागून आहे.

या तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. तेथील कापसाचे पीक पावसाअभावी करपून गेल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा व्यापाऱ्यांना कापूस खरेदीचा मुहूर्त साधता आलेला नाही. आता दिवाळीची वाट बघावी लागेल.

Cotton News
Onion Rates Hike: विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उन्हाळी कांदा भावाचे सीमोल्लंघन! क्विंटलला 551 ते 750 रुपयांची वृद्धी

प्रत्यक्ष लागवड ८० टक्के

दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळख असलेल्या मालेगाव, नांदगाव, येवला व सिन्नर तालुक्यांतच कापसाचे उत्पादन घेतले जाते. जून महिन्यातील रिमझिम पावसाच्या भरवशावर तब्बल ३६ हजार ८५९ हेक्टर अर्थात ८० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. त्यापैकी किमान ६० ते शंभर टक्के पिकाचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय कापूस लागवड क्षेत्र (हेक्टर)

मालेगाव : २५,४७९ (९८.७६ टक्के)

नांदगाव : १०,००५ (१२७.८७ टक्के)

येवला : १,२८३ (११.६३ टक्के)

सिन्नर : ५७ (४.४९ टक्के)

बागलाण : १४.४ (१२.४१ टक्के)

Cotton News
Nashik Onion Rates Hike: नामपूरला कांदा @4000! मागणी वाढत असल्याने प्रथमच उच्चांक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com