जलप्रदूषण नियंत्रण मोहिमेत विक्रम; 2 लाख मूर्तींचे संकलन

Ganesh Murti Sankalan
Ganesh Murti Sankalan esakal
Updated on

नाशिक : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद देत नदी प्रदूषण होवू नये म्हणून तब्बल एक लाख ९७ हजार ४८८ गणेशमूर्ती दान केल्या, तर १४४ मेट्रीक टन निर्माल्य नदी पात्रात न फेकता समस्त नाशिककरांनी पेटीत टाकले.

नाशिककरांच्या मूर्ती व निर्माल्य दानामुळे जलप्रदूषणाबाबत जनजागृती वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फिरता तलाव उपक्रमातही नाशिककरांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. (record in water pollution control campaign collection of 2 lakh Ganesha idols Nashik Latest Marathi News)

महापालिकेने पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद दिला. महापालिकेच्या सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक, कृत्रिम विसर्जन स्थळे व निर्माल्य संकलन केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती.

बांधकाम विभागामार्फत तलाव, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेसोबतच निर्माल्य संकलित केले. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, उपायुक्त मनोज घोडे- पाटील, उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर, उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त अर्चना तांबे, उपायुक्त विजयकुमार मुंढे, विभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन केले. दरम्यान, मागील वर्षी एक लाख १३ हजार ८६१ मूर्ती संकलित झाल्या, तर ११७. ८५ टन निर्माल्य संकलित झाले होत्या.

या संस्था धावल्या मदतीला

निर्माल्य संकलित करण्यासाठी के. के. वाघ कॉलेजचे विश्‍वस्त अजिंक्य वाघ, प्रा. स्वानंद डोंगरे व ३०० विद्यार्थी, वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्कार सोनवणे व त्यांचे २० स्वयंसेवक, बिटको कॉलेजचे विजय सुकटे व त्यांचे १०० स्वयंसेवक , दिल्ली पब्लिक स्कूलच्या साक्षी बनसोडे व त्यांचे १६ विद्यार्थी, पोलिस मित्र आडगाव पोलिस स्टेशन यांचेकडील ५० स्वयंसेवक, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे ५० स्वयंसेवक, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब ऑफ गोदावरी, रोटरी क्लब ऑफ वेस्ट, रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्या प्रत्येकी २५ सदस्य आणि भोसला मिलिटरी स्कूलच्या १०० कॅडेटनी उपस्थित राहून मूर्ती संकलनात सहभाग नोंदविला.

Ganesh Murti Sankalan
Ganeshotsav 2022 : मिरवणुकीत भाविकांचा जल्लोष..!

विभागनिहाय निर्माल्य संकलन (किलोमध्ये)

पूर्व - २१,२९०
पश्चिम - १३,९४०
नाशिक रोड - २०,५४५
पंचवटी- ३६,०१०
सिडको- २२,२७५
सातपूर- २९,८४५
एकूण - १४३.९०५

विभागनिहाय मुर्ती संकलन

विभाग मूर्ती संकलन
पंचवटी ७२,८६६
सिडको १७,८२८
नाशिक रोड ५०,५९७
पश्चिम १०,५०८
पूर्व २०,४७८
सातपूर २५,२११
एकूण १,९७,४८८

फिरता तलाव (टँक ऑन व्हील)

नाशिक रोड-३१
पंचवटी-७२
सिडको-१४६
सातपूर-१३२
एकूण - ३८१

गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ

२०१९ मध्ये एक लाख तेरा हजार गणेशमूर्तींचे संकलन झाले होते.
यंदा ८४ हजार अधिक मुर्ती दान झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत पावसामुळे नदीला पाणी सोडण्यात आल्याने त्याचा फायदा घेत पाण्यात मुर्ती सोडण्यात आल्या. त्यामुळे महापालिकेने शंभर टक्के मूर्तीदान झाल्याचा दावा केला असला तरी त्यात तथ्य नाही. मात्र मुर्ती संकलनाचा मागील वर्षाचा विक्रम मोडीत निघाला आहे.

"पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करताना जनजागृती देखील केली. परिणामी नाशिककरांनी त्याला चांगला प्रतिसाद देताना मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढला. गोदावरी प्रदूषण कमी करण्यासाठी अशीच साथ नाशिककरांनी कायम ठेवावी."

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

Ganesh Murti Sankalan
Unity in Diversity : ..अन् बाप्पाच्या मिरवणुकीचे ढोल ताशे काही क्षण बंद झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com