५४ वर्षानंतर डिसेंबरला चोवीस तासात विक्रमी पाऊस

१६ डिसेंबर १९६७ ला नाशिकला झाला होता विक्रमी पाउस
५४ वर्षानंतर डिसेंबरला चोवीस तासात विक्रमी पाऊस

नाशिक : शहरात गेल्या चोवीस तास संततधार सुरू असूनअविरत सुरू असलेल्या पावसाने अजिबात उसंत न घेता ६३.८मिलीमीटर पाउस बरसला. गेल्या चोवीस तासातील नाशिक शहरातील५४ वर्षानंतरचा चोवीस तासात डिसेंबर महिण्यात विक्रमी पावसाचाविक्रम ठरला.यापूर्वी १६ डिसेंबर १९६७ ला नाशिक शहरात २४ तासात ३१ मिमी.पाउस झाला होता. त्यानंतर तब्बल चोप्पन वर्षानंतर हा विक्रम मोडीतनिघाला.नाशिक शहरात ५४ वर्षापूर्वीचा सर्वकालीन विक्रम हा १६ डिसेंबर १९६७ ला३१ मि.मी इतका पाउस झाला होता. मात्र आज गुरुवारी (ता.२) डिसेंबरलाशहरात चोवीस तासात ६३.८ मि.मी पाउस झाला.

५४ वर्षापूर्वी एकुण संपूर्णडिसेंबर महिन्याचा सर्वकालीन विक्रम ९७.४ मि.मी इतका आहे. मात्र डिसेंबरमहिण्याचा विक्रम मात्र अजून शाबूत आहे. मात्र आज २ डिसेंबर असूनआणखी २९ दिवसा महिणा पूर्ण व्हायला बाकी आहे. पहिल्या दोन दिवसांत६३.८ मि.मी पाउस झाला. या महिणाभरात पावसाचा जोर कायम राहिलातर ९७.४ मिमी पावसाचा विक्रम मोडीत निघणार आहे.नाशिक शहर आणि परिसरात बुधवारी (ता १) डिसेंम्बर सकाळी आठ पासून तर आज गुरुवारी (ता २) पहाटे साडे पाच पर्यंत ५९.२ मिलीमीटरपाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात हलक्या ते मध्यमस्वरूपाचा पाऊस सुरू असून नाशिक शहर- तालुका हे दोन दिवसांपासूनसुरू असलेल्या पावसाचे केंद्रबिंदू राहिले.जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी,त्रंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यात मध्यम स्वरूपातपाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक जिल्यातीलधरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ही संततधार अशीच सुरू राहिल्यास महिनाभरातरिक्त झालेली धारण पुन्हा ओव्हरफलो होऊन काही धोरणातुन विसर्ग सुरूकरावा लागण्याची शक्यता आहे.

२४ तासांत पाऊस

०८.३० ते १७.३०. -१९.० मिमी

१७.३० ते २०.३० - ०७.४ मिमी

२०.३० ते २३.३० - ११.४ मिमी

२३.३० ते ०२.३० - १२.१ मिमी

०२.३० ते ०५.३० - ०८.९ मिमी

०५.३० ते ०८३० - ०४.६ मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com