Registration of weight blood group of students is mandatory for teacher nashik news
Registration of weight blood group of students is mandatory for teacher nashik newsesakal

Nashik News : गुरुजींवर आणखी एका कामाचा अधिभार! विद्यार्थ्यांचे वजन, रक्तगट नोंदविणे केले सक्तीचे...

Nashik News : शैक्षणिक कामाशिवाय इतर कामे नको, यासाठी शिक्षकांची आंदोलने सुरू असतानाच आता शासनाने शिक्षकांवर आणखी एका कामाचा भार टाकला. यू-डायस प्लस पोर्टलवर नियमित माहितीबरोबर विद्यार्थ्यांचे वजन व रक्तगटाची माहिती भरावयाची आहे. त्यामुळे रक्तगट तपासणीचे वेगळेच काम शिक्षकांच्या मागे लागले. परिणामी, शिक्षक हैराण झाले आहेत.

यू-डायस प्लस प्रणालीद्वारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनांच्या माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. (Registration of weight blood group of students is mandatory for teacher nashik news)

जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते. दरवर्षी मुख्याध्यापकांना यू-डायसवर विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण माहिती अपलोड करावी लागेल.

यात प्रामुख्याने एकूण ११ विभाग असून, एकूण ५६ प्रकारची माहिती भरावी लागते. यंदा मात्र यात विद्यार्थ्यांचे रक्तगट लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. रक्तगट लिहिला नाही, तर माहिती स्वीकारली जात नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा रक्तगट कुठून आणायचा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. यू-डायसमध्ये एका विद्यार्थ्याची तब्बल ५६ प्रकारची माहिती भरताना शिक्षकांची आधीच दमछाक होत असताना आता वजन व रक्तगट कसा भरायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

Registration of weight blood group of students is mandatory for teacher nashik news
Maharashtra School Teacher News : इंग्रजी माध्यमाचेच शिक्षक देणार इंग्रजीचे धडे! शासनाचे परिपत्रक

बहुसंख्य विद्यार्थ्यांना रक्तगट माहिती नसतो. रक्तगट नमूद करायचा तर अंदाजे टाकून चालणार नाही. त्यासाठी रक्ताची तपासणी करावी लागणार आहे. खेडेगावात रक्तगट तपासण्याची सुविधा नसते. पालकांना सांगितले, तर अनेक जण नाके मुरडतात. त्यामुळे शिक्षकांना पदरमोड करून शाळेतच रक्तगट तपासणी करण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.

३१ डिसेंबरपर्यंत भरायची आहे माहिती

ही माहिती यू-डायसवर भरण्यास यंदा १ सप्टेंबरपासून सुरवात झाली. त्याला ३१ डिसेंबर ही अखेरची तारीख आहे. विद्यार्थ्यांचा रक्तगट जाणून शिक्षण विभाग काय करणार आहे? पालक खर्च करून रक्तगट तपासणी करीत नाहीत. शासनाला माहितीच पाहिजे असेल तर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्राला सूचना देऊन संबंधित शाळेत येऊन मोफत रक्तगट तपासणी शिबिर घ्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गाकडून होऊ लागली आहे.

Registration of weight blood group of students is mandatory for teacher nashik news
Nashik MD Drug Case: अमली पदार्थांविरोधात आता एकत्र लढा; पोलिस, अन्न औषध, उत्पादन शुल्क समन्वयाने काम करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com