मालेगावी भरवस्तीत गोळीबार; कारखानदाराला लुटण्याचा प्रयत्न

Firing latest Crime News
Firing latest Crime Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पवारवाडी भागात भरवस्तीत कारखानदाराला लुटण्याच्या प्रयत्नात चौघा संशयित दरोडेखोरांनी दोन वेळा गोळीबार केला. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

पवारवाडी परिसतील कारखानदार वेतनासाठी पैसे घेऊन जात असल्याने रोकड लुटण्यासाठी संशयित दरोडेखोरांनी कारखानदारावर हल्ला केला. सुदैवाने दरोडेखोरांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. कारखानदाराशी झटापट झाल्याने व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने एका संशयिताला ताब्यात घेतले, अन्य तिघे संशयित फरार झाले आहेत. (Reliable firing at Malegaon Attempt to rob factory owner nashik crime Latest Marathi News)

दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या घटनेतील सर्व संशयित सर्राइत गुन्हेगार आहेत. गुरुवारी (ता. ४) सकाळी साडेनऊच्या सुमारास कारखानदार दिनेश रुंग्ठा (रा. सोयगाव) हे कामगारांचे वेतन अदा करण्यासाठी ५० हजार रुपये रोख घेऊन कारखान्याकडे जात होते.

यावेळी सईद अहमद शफीक अहमद (रा. हकीमनगर), सहवाद मोहम्मद, यासीन इकबाल, राजीव (पूर्ण नाव समजू शकले नाहीत) यांनी त्यांचा पाठलाग केला. पवारवाडी भागात त्यांनी श्री. रुंग्ठा यांच्याकडील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांची दरोडेखोरांशी जोरदार झटापट झाली. येथे गर्दी येत असल्याचे जाणवताच झटापतीतच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला. आरडाओरड व गोळीबार आवाज आल्याने स्थानिक रहिवासी व कामगार तेथे धावून आले.

Firing latest Crime News
प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळली

त्यांनी झटापट सुरु असतानाच सईद शफीक अहमद याला ताब्यात घेतले. नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याजवळून गावठी कट्टा, जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. अन्य तिघे संशयित फरार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पवारवाडी पोलिस निरीक्षक व सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सईदला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पहाणी व पंचनामा केला. या प्रकरणी श्री. रुंग्ठा यांच्या तक्रारीवरुन पवारवाडी पोलिस ठाण्यात दरोडा व रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिघा संशयितांचा शोध घेत आहेत.

Firing latest Crime News
Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com