esakal | 'या' धरणांतील पाणीसाठा वाढल्याने कसमादेतील पाणीपुरवठा योजनांना दिलासा...!
sakal

बोलून बातमी शोधा

chankapur dam.jpg

मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावात ८६ दशलक्ष घनफूट साठा असून, तलाव पूर्ण भरला आहे. दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलावही भरला आहे. गिरणेचे पूरपाणी आणखी महिनाभर चालल्यास नदीकाठच्या विहिरींना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार आहे. पाणीपुरवठा योजनांना पुढील दोन ते अडीच महिने पूरपाण्याचा फायदा होऊ शकेल. 

'या' धरणांतील पाणीसाठा वाढल्याने कसमादेतील पाणीपुरवठा योजनांना दिलासा...!

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक : (मालेगाव) कळवण तालुक्यावर रुसलेल्या पावसाचे गेल्या आठवड्यात दमदार आगमन झाल्याने चणकापूर व पुनंद धरणांतील साठा झपाट्याने वाढला. चणकापूर ७७, तर पुनंद ८७ टक्के भरले आहे. दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूरपाण्यामुळे योजनांचे जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत. 

चणकापूर ७७, तर पुनंद धरणात ८७ टक्के साठा  

कसमादेत समाधानकारक पाऊस होत असताना चणकापूर व पुनंद धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नव्हता. सुरवातीचे दोन महिने पाऊस न झाल्याने धरणातील साठा कमी होता. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाने साठ्यात वाढ झाली. चणकापूर धरणाचा साठा एक हजार ८६२ झाला असून, धरणातून ७०६ क्यूसेक पाणी गिरणा नदीत सोडले जात आहे. पुनंदमध्ये एक हजार १४३ दशलक्ष घनफूट साठा झाला असून, धरणातून एक हजार २५५ क्यूसेक पाणी गिरणा नदीत वाहत आहे. गिरणेच्या पूरपाण्यामुळे ठेंगोडा बंधाराही ओव्हरफ्लो झाला आहे. ठेंगोडा बंधाऱ्यातून दोन हजार १७ क्यूसेक पाणी गिरणा नदीपात्रात सोडले जात आहे.

दोन ते अडीच महिने पूरपाण्याचा फायदा

पूरपाण्यामुळे मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांचा साठा भरून घेण्यात आला आहे. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावात ८६ दशलक्ष घनफूट साठा असून, तलाव पूर्ण भरला आहे. दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलावही भरला आहे. गिरणेचे पूरपाणी आणखी महिनाभर चालल्यास नदीकाठच्या विहिरींना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार आहे. पाणीपुरवठा योजनांना पुढील दोन ते अडीच महिने पूरपाण्याचा फायदा होऊ शकेल. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

मोसम खोऱ्याला दिलासा 

संपूर्ण मोसम खोऱ्यात या वर्षी चांगला पाऊस होत आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. आठवड्यापासून मोसम नदीपात्रात धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हरणबारीतून एक हजार २२२ क्यूसेक पाणी मोसम नदीपात्रात वाहत असल्याने नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला. शिवाय या भागातील विहिरींना पाणी उतरण्यास मदत झाली आहे.  

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top