लवकरच शिल्लक डाळींचे लाभार्थ्यांना वाटप; छगन भुजबळांची माहिती

छगन भुजबळ : केंद्राच्या विलंबाने मंजुरीमुळे डाळींचे नुकसान
chagan bhujbal
chagan bhujbalchagan bhujbal

नाशिक : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने गुरुवारी (ता. १५) परवानगी दिली. त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थ्यांना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ : केंद्राच्या विलंबाने मंजुरीमुळे डाळींचे नुकसान

केंद्र सरकारशी गेल्या २६ नोव्हेंबर २०२० ला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तीन योजनांमध्ये काही प्रमाणात डाळी शिल्लक असून, त्यांच्या वितरणाबाबत केंद्र सरकारचे धोरण कळविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती; परंतु केंद्र सरकारने त्या शिल्लक डाळींचे वाटप करण्याबाबत राज्य शासनास केंद्र सरकारचे धोरण कळविले नसल्याने ३ मार्च २०२१ च्या पत्रान्वये केंद्र सरकारला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ व आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत शिल्लक असलेल्या डाळींची आकडेवारी कळवून वितरणासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतरदेखील केंद्र सरकारने त्यांचे धोरण राज्य शासनास कळविले नाही. त्यामुळे राज्य शासनाने या ६ एप्रिलच्या पत्रान्वये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत डाळींचे वाटप केल्यानंतर अंतिमत: शिल्लक राहिलेल्या डाळींची आकडेवारी केंद्र सरकारला कळविली असता केंद्राने गुरुवारी (ता. १५) मंत्रालयाचे उपसंचालक संजय कौशिक यांच्या स्वाक्षरीने पत्रान्वये संबंधित शिल्लक डाळींचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना करण्याबाबत कळविले आहे.

कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा अखाद्य डाळीचे वितरण होणार नाही,

एकंदरीत तूरडाळ व हरभराडाळ यांचे वितरण शक्यतो लवकरात लवकर होणे आवश्यक असते. मात्र, केंद्र सरकारकडून शिल्लक डाळींच्या वितरणासंदर्भात धोरण कळविणे आवश्यक होते. संबंधित डाळींच्या वितरणासंदर्भातील धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारकडून गुरुवारीच प्राप्त झालेला असल्याने त्यातील निर्देशास अनुसरून महाराष्ट्रातील शिल्लक सहा हजार ४४२ टन डाळींचे लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरण करण्यात येत आहे. हे करत असताना कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा मानवी खाण्यास अखाद्य डाळीचे वितरण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com