VIDEO : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या मातोश्रींच्या अस्थींचं गोदावरीत विसर्जन!

piyush goyal2.jpg
piyush goyal2.jpg
Updated on

नाशिक : केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आज सोमवारी (ता. 8) नाशिकमध्ये कुटुंबियांसह आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभेच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले होते. आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी आज सकाळी आले होते. गोदातीरी रामकुंडावर  विधीवत पूजन करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाजपनेते गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.

अस्थींचे विसर्जन गोदातीरी

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी (ता. 6) सकाळी निधन झाले होते. गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. आपल्या आपुलकीने प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी गोयल यांनीच ट्विटरद्वारे दिली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन गोदातीरी रामकुंडावर करण्यासाठी गोयल कुटुंबियांसह नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती.

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती

यानुसार सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यानंतर ते शिवनेरी ईमारत येथे गिरणा/गोदावरी सूट येथे थांबले. याठिकाणी त्यांच्या भेटीसाठी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील दाखल झाले होते. गोयल यांनी थोड्याच वेळात पंचवटीतील रामकुंड येथे जाऊन अस्थींची विधिवत पूजा करून रामकुंडात अस्थींचे विसर्जन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com