esakal | आत्मनिर्भर फार्मसी युवकांकडून शैक्षणिक नुकसानीवर भन्नाट उपाय...एकदा वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

kunal darade.jpg

संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान चालू असताना लॉकडाउन व अनलॉकमुळे सहा महिन्यांपासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर पर्याय म्हणून लासलगावच्या फार्मसी युवकाने ‘फार्मा विसडोम हब लाइट’ या नावाचे ॲप स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यान्वित केले आहे. 

आत्मनिर्भर फार्मसी युवकांकडून शैक्षणिक नुकसानीवर भन्नाट उपाय...एकदा वाचाच

sakal_logo
By
अरुण खागल

नाशिक : (लासलगाव) संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान चालू असताना लॉकडाउन व अनलॉकमुळे सहा महिन्यांपासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर पर्याय म्हणून लासलगावच्या फार्मसी युवकाने ‘फार्मा विसडोम हब लाइट’ या नावाचे ॲप स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यान्वित केले आहे. 

आत्मनिर्भर फार्मसी युवकाकडून शैक्षणिक नुकसानीवर उपाय 

चीन आणि भारत या दोन देशांमधील तणावाची परिस्थिती बघता कोट्यवधींच्या व्यापारासह विविध ॲपवर बहिष्कार टाकून आत्मनिर्भर भारताचा नारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. या मिशनमध्ये लासलगावचा भूमिपुत्र एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी प्रतीक उमेश पारीक याने फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ॲप विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी कार्यान्वित केले आहे. मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, सेक्रेटरी कुणाल दराडे, प्राचार्य डॉ. गोकूळ तळेले, प्रा. डॉ. वैभव आहेर, प्रा. प्रशांत व्यवहारे, प्रा. श्रद्धा सांगळे, प्रा. पूनम शिंदे, प्रा. सचिन कापसे, प्रा. राकेश शेळके यांनी प्रतीकला या ॲपसाठी मार्गदर्शन केले. 

काय आहे ॲपमध्ये?
 
- डी. फार्म व बी. फार्मच्या सर्व विषयांची रेफरन्स पुस्तके 
- फार्मसीच्या स्पर्धा परीक्षा नोट्स व सराव प्रश्नपत्रिका 
- साप्ताहिक सराव परीक्षा 
- सिल्याबस व्हॉइस, व्हिडिओ लेक्चर 
- फार्मा ब्लॉग 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

मेडिकल क्षेत्रांमधील सर्वसमावेशक असलेल्या या शैक्षणिक ॲपद्वारे लॉकडाउनच्या काळात अभ्यासक्रमादरम्यान येणाऱ्या शैक्षणिक अडचणी यामुळे दूर होण्यास मदत होईल. आमच्या संस्थेच्या नाव लौकिकात प्रतीकने भर टाकली आहे. भविष्यामध्ये प्रतीकला आगामी ध्येयांसाठी निश्चित मदत केली जाईल. - कुणाल दराडे, सेक्रेटरी, मातोश्री फार्मसी कॉलेज 

देश आज ज्या परिस्थितीतून जात आहे, विशेषता: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शैक्षणिक सुविधा नसताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या ॲपची निर्मिती केली आहे. - प्रतीक पारीक, ॲप निर्माता  

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - किशोरी वाघ
 

loading image
go to top